मुंबई : प्रजाकसत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राज्य पोलिस दलातील 75 हून अधिक पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहेत. त्यात 31 शौर्य, 4 उल्लेखनीय सेवा तर 40 गुणवत्तापूर्वक सेवेसाठी राष्ट्रपदी पदक जाहीर झाले आहेत. विशेष म्हणजे यंदा राज्य पोलिस दलात एक नव्हे, तर तब्बल 31 शौर्य पदक जाहीर झाले असून सर्वच पोलिस अधिकारी आणि कर्मचारी गडचिरोलीचे आहेत.
प्रजाकसत्ताक दिनानिमित्त राज्य पोलिस दलातील पोलिस अधिकारी आणि कर्मचारी अशा 75 जणांना रविवारी राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले. उल्लेखनीय सेवेसाठी चार पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहेत. त्यात पूर्व प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त महेश उदाजी पाटील, दक्षिण विभागाचे पोलिस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभागाचे पोलिस उपायुक्त बाळकृष्ण मोतीराम यादव, पिंपरी-चिंचवडचे सहायक पोलिस आयुक्त विठ्ठल खंडूजी कुबडे, मुंबई वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त सायरस बमन इराणी यांचा समावेश आहे.
गुणवत्तापूर्वक सेवेसाठी 40 पोलिसांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. त्यात सागरी व विशेष सुरक्षा विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक राजीव जैन, पुणे गुन्हे अन्वेषण विभागचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ, पोलिस अधीक्षक शीला साईल, मोहन दहिकर, सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त पुरुषोत्तम कराड, अतिरिक्त पोलिस अधीक्षक किरण पाटील, पोलिस उपायुक्त नीलम वावळ, पोलिस निरीक्षक अविनाश शिलिमकर, उपअधीक्षक गजानन शेळके, सहायक पोलिस आयुक्त महेश तावडे, विजय माहुलकर, समीर साळुंखे, अनंत माळी, पराग पोटेय, दयानंद दिघे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे, महादेव खांदारे, सुवर्णा शिंदे, सुनिल शिंदे, महेंद्र कोरे, कैलास बारभाई, पोलिस उपनिरीक्षक विजय मोहिते, भरत सावंत, सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र राऊत, अफजल शहाजादे खान पठाण, प्रदीप सावंत, पोलिस उपनिरीक्षक सुभाष साळवी, सतीश निंबाळकर, मनोज गुजर, अजय सावंत, बाबासाहेब ढाकणे, शिवदास फुटाणे, विजयकुमार शिंदे, विक्रम नवारखेडे, विजय देवरे, मनोज गुज्जर, गंगाधर घुमरे, संजय शेलार, राजकुमार टोलनुरे, बाबासाहेब ढकाणे, सुरेश सोनावणे यांचा समावेश आहे.
यंदा राज्याला 31 शौर्य पदक जाहीर झाले असून सर्व अधिकारी आणि कर्मचारी गडचिरोलीचे आहेत. त्यात गडचिरोलीचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल फडतरे (सध्या पिंपरी-चिंचवडचे पोलिस निरीक्षक), पोलिस उपनिरीक्षक वासुदेव मडावी, पोलिस उपनिरीक्षक मधुकर नैताम, पोलिस हवालदार संतोष नैताम, पोलिस नाईक राजू चव्हाण, पोलिस नाईक सुधाकर वैलादी (मरणोत्तर), पोलिस हवालदार विलास पोरतेट, पोलिस नाईक विश्वनाथ सडमेक, ज्ञानेश्वर तोरे, दिलीप सडमेक, रामसू नरोटे, आनंदराव उसेंडी, राजू चव्हाण, अरुण मैश्राम, नितेश वेलादी, पोलिस शिपाई मोहन उसेंडी, संदीप वसाके, कैलास कोवासे, हरिदास कुलयेटी, किशोर तलांडे, अनिल मडावी, आकाश उईके, कारे आत्राम (मरणोत्तर), राजू पुसाली, महेश जाकेवार, रुपेश कोडापे, मुकेश सडमेक, योगेंद्रराव सडमेक, घिस्सू आत्राम, अतुल मडावी, विश्वनाथ मडावी यांचा समावेश आहे.