मुंबईतील पुरातन वास्तूंची होणार नियमित देखभाल  pudhari photo
मुंबई

Mumbai heritage conservation : मुंबईतील पुरातन वास्तूंची होणार नियमित देखभाल

स्थायी समितीत विरोधानंतरही बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबई शहरातील २२ पुरातन वास्तू आणि पुतळ्यांची आता नियमित देखभाल आणि दुरुस्ती होणार आहे. यासाठी कंत्राटदार नियुक्तीचा प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीत मंजूर करण्यात आला. २ कोटी २८ लाख ९७ हजारांचे हे काम मे. डी. आर. शहा कंपनीला दिले असून ३६ महिन्यांत हे काम त्यांना करायचे आहे.

मुंबईमधील फोर्ट विभागात पुरातन वास्तूंचे प्रमाण अधिक आहे. मुंबईत येणारे पर्यटक हे मुख्यतः या वास्तूंच्या कलाकुसर व बांधकामांनी आकर्षित होत असतात. त्याचे नियमीत देखभाल होणे गरजेचे असते. परंतु गेल्या काही वर्षांपासून याकडे दुर्लक्ष झाल्याने या वास्तूंची दुरवस्था झालेली पहावयास मिळत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने या कामासाठी निविदा मागवल्या होत्या. त्यातील एकाची निवड करून करून हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता.

स्थायी समितीत एमआयएम नगरसेवक जमीर कुरेशी यांनी याला विरोध दर्शवला. २२ ऐतिहासिक वास्तूचे कंत्राट अभ्यास न करता काढण्यात आले आहे.तीन लाखांवरील कंत्राट हे ई- टेंडरींग करावे लागते, परंतु २ कोटी २८ लाख ९७हजारांचे हे काम प्रशासनाने थेट स्थायी समितीसमोर आणल्याने आक्षेप नोंदवला.

२२ पुतळे एकदाच स्वच्छ करणार? असा प्रश्न उपस्थित करीत सफाई आणि देखभाल कशी करणार, याविषयीही भूमिका स्पष्ट न करता प्रस्ताव घाईघाईने केल्याचा आरोप केला. यानंतर विरोध झुगारून बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

या वास्तूंची होणार देखभाल - दुरूस्ती :

फ्लोरा फाऊंटन, फिटङ्गेराल्ड कारंजे व दिवा, बॅण्ड स्टँडचे स्मारक, कोठारी फ्याऊ, रूस्तमजी मुलजी कारंजे, वेलिंग्टन कारंजे.

संगमरवरी पुतळे

महादेव गोविंद रानडे, सोहरबाजी शापूरजी बेंगाली, गोपाल कृष्णा गोखले, दिनशॉ मानेकजी पेटीट.

कांस्य धातूचे पुतळे

होरमसजी कावसजी दिनशॉ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जमशेदजी जीजीभॉय, सन दिनशॉ एडलजी वाच्छा, दादाभाई नवरोजी, फिरोजशहा मेहता, राजीव गांधी, स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, लाल बहादूर शास्त्री, हुतात्मा स्मारक, पंडीत जवाहरलाल नेहरू.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT