दिल्लीत विक्रमी पाऊस; मुंबईच्या विमानांना फटका File Photo
मुंबई

दिल्लीत विक्रमी पाऊस; मुंबईच्या विमानांना फटका

मुंबई-दिल्लीदरम्यान उडणारी पंधरा विमाने शुक्रवारी रद्द

पुढारी वृत्तसेवा

मुंबई/नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत शुक्रवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसाने गेल्या ८८ वर्षांतील विक्रमी पर्जन्यवृष्टीची नोंद केली आणि यमुना नदीच रस्त्यावर उतरली. मंत्री, खासदारांचे बंगले असलेल्या परिसरातही पाणी शिरल्याने दिल्लीची दाणादाण उडाली. दिल्लीच्या विमानतळावरील टर्मिनल १ चे छत कोसळल्याने त्याचा फटका मुंबईलाही बसला आणि मुंबई-दिल्लीदरम्यान उडणारी पंधरा विमाने शुक्रवारी रद्द झाली.

या वादळी पावसात इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल - १ वरील लोखंडी छताचा भाग कोसळून झालेल्या अपघातात एका कारचालकाचा मृत्यू झाला, तर सहाजण जखमी झाले. टर्मिनल १ वरील सर्व विमानांचे उड्डाण दुपारी दोनपर्यंत रद्द करण्यात आले. चेक इन काऊंटरही काही काळ बंद होते.

दिल्ली विमानतळ, प्रगती मैदान बोगदा, कर्तव्यपथ, कॅनॉट प्लेस, एम्स रुग्णालय आदी ठिकाणे पाण्यात बुडाली. भाजपचे नगरसेवक रविंदरसिंह नेगी यांनी तर रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून चक्क होडी चालवली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT