केईएम रुग्णालयात हृदय प्रत्यारोपण यशस्वी Pudhari File Photo
मुंबई

केईएम रुग्णालयात हृदयदानातून मिळाला रिक्षाचालकाला पुनर्जन्म

पुढारी वृत्तसेवा

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : केईएम रुग्णालयात ६० वर्षानंतर यशस्वी हृदय प्रत्यारोपण करण्यात आले असून एक मोठा टप्पा पार करण्यात आला आहे. कल्याणमधील ३४ वर्षे महिलेच्या हृदय छत्रपती संभाजीनगर ३८ वर्षाच्या रिक्षाचालकाला बसविण्यात आले आहे. गुरूवारी केईएममध्ये यशस्वी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली.

संभाजीनगर येथील रिक्षा चालकाला हृदयविकाराचा झटका आला त्यांना केईएम रुग्णालयात आर्टी मध्ये स्टेंट टाकण्यात आल्या. त्यानंतर देखील परत त्याला ह्र्दय विकाराचा झटका आला. यात त्याचे हृदय अत्यंत कमकुवत झाले. या स्थितीला वैद्यकीय भाषेत कार्डिओ मायोपॅथी म्हणतात. अनेक वर्ष हा रुग्ण हृदयाच्या शोधात होता त्याच्या पत्नीकडून अनेक वेळा हृदयासंदर्भात विचारणा होत होती. मात्र हृदय मिळणे अवघड झाले. त्यांची परिस्थितीही हलाखीची असल्याने त्याच्या शस्त्रक्रियेसाठी आलेला खर्च टाटा ट्रस्टकडून करण्यात आला.

कल्याण पत्रीपुल येथे राहणारी ३४ वर्षीच्या दिपाली परब या गरोदर महिलेच्या मेंदूत रक्तस्राव झाला. आणि तिला ७ जुलै रोजी केईएम रुग्णालयातील एम आय सी यु मध्ये दाखल केले.. मात्र ही महिला अतिशय गंभीर झाली. प्रसुती दरम्यान तिला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची परिक्रष्टा केली मात्र प्रसूतीदरम्यान तिचा मृत्यू झाला. मात्र तिने एका गोंडस बाळाला दिलेल्या बापालाही मृत्यू झाला . या महिलेच्या मृत्यूनंतर पत्नी आणि बाळ गेल्याचे दुःख जबाबदारी अंगावर असतानाही तिच्या पतीने अवयवदान दान करण्याचा निर्णय घेतला. गुरूवारी (दि.11) मध्यरात्री साडेबारा वाजता हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. यासाठी केईएम च्या सर्व डॉक्टरांनी प्रयत्नांची परिक्रष्टा केली. माझा देव तुम्हीच असल्याची ष्रतिक्रिया देत अशा केईएम अधिष्ठाता डॉ संगीता रावत यांचा आभार मानले.

केईएम रुग्णालयात ६० वर्षानंतर हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

केईएम रुग्णालयात ६० वर्षानंतर यशस्वी हृदय प्रत्यारोपण करण्यात आले असून एक मोठा टप्पा पार करण्यात आला आहे. ठाण्यातील ३४ वर्षे महिलेच्या हृदय छत्रपती संभाजीनगर येथील ३८ वर्षाच्या युवकाला बसविण्यात आले आहे. गुरूवारी केईएममध्ये यशस्वी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली.

डॉक्टरांचे पालिका प्रशासनाकडून कौतुक

या रुग्णाला हृदय देणाऱ्या दात्याचे, त्याच्या कुटुंबियाचे तसेच ही हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी करणारे हृदय शस्त्रक्रिया विभाग प्रमुख डॉ. उदय जाधव, केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, सर्व डॉक्टर, परिचारिका, वॉर्ड बॉय, समुपदेशक आणि संबंधित सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने कौतूक करत आभारही मानले आहे. केईएम रुग्णालयामध्ये १९६३-६४ मध्ये पहिल्यांदा हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती. दुर्दैवाने ती यशस्वी होऊ शकली नाही. त्यामुळे त्यानंतरची अनेक दशके प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करता आल्या नाहीत. यासाठी अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी पाठपुरावा करून विभाग सुरू करण्यात आला. अत्याधुनिक शस्त्रक्रिया विभाग, उपकरणांसह मनुष्यबळही घेऊन सुसज्ज विभाग तयार केला होता. हृदय प्रत्यारोपण करणारे देशातील एकमेव पालिकेचे रुग्णालय आहे.

एका वर्षात आधी प्रत्यारोपणाची तयारी

१५ ऑक्टोबर २०२३ रोजी यासाठी प्रशासनाला तात्पुरता परवाना (प्रोव्हिजनल लायसन्स) मिळाला. त्यानंतर हृदय शस्त्रक्रियेसाठी आवश्यक उपकरणे आणि सामग्री खरेदी करण्यात आली. यासाठी २० पेक्षा जास्त अत्यंत उच्च दर्जाची वैद्यकीय उपकरणे घेऊन तसेच अत्यंत अनुभवी आणि समर्पक वैद्यकीय चमूंच्या साहाय्याने सुसज्ज विभाग कार्यान्वित करण्यात आला आहे.

महापालिका रुग्णालयात केवळ खर्च ८ लाख

हृदय प्रत्यारोपण करण्यासाठी खासगी रुग्णालयात साधारणता खर्च रुपये ३५ लाख येतो. पण महापालिकेने हा खर्च ८ लाख रुपये इतका असेल. महानगरपालिकेच्या पुढाकाराने हाही खर्च महात्मा फुले जन आरोग्य योजना, माननीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि माननीय पंतप्रधान सहाय्यता निधी या द्वारे करण्यासाठी सहाय्य केले जाते आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT