मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण, असे टीकास्त्र भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोशल मीडिया पोस्टमधून सोडले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा कोलकाता येथील व्हिडीओ शेअर करत त्यांनी काँग्रेसवर घणाघात केला.
रवींद्र चव्हाण यांनी म्हटले की, 'सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण! ज्या राज्यांमध्ये तब्बल ४०-४० वर्षे काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ शकला नाही, तिथे त्यांच्याच मित्रपक्षांची सत्ता होती. व्होटचोरीचा आरोप करणारे राहुल गांधी आणि काँग्रेस नेते याबद्दल तोंडातून ‘ब्र’ देखील काढणार नाहीत.
‘चोराच्या उलट्या बोंबा’ म्हणतात ते हेच!' केंद्रीय गृहमंत्र्यांनी आपल्या भाषणात विविध राज्यांमध्ये किती वर्षांपासून काँग्रेसचा एकही मुख्यमंत्री झालेला नाही, याचा पाढा वाचला. ते म्हणाले की, 'काँग्रेसने या पराभवानंतर आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे.
राहुल गांधी नेते झाल्यापासून देशातील नागरिक त्यांच्याविरोधात कौल देत आहेत आणि राहुलच्या नेतृत्वात 'इंडिया आघाडी' पुन्हा मोडण्यास सुरुवात झाली आहे, असेही ते म्हणाले.