Uday Samant 
मुंबई

Kendriya Vidyalaya : नाचणेत केंद्रीय विद्यालय उभारणीचा मार्ग मोकळा

सरकार देणार अडीच हेक्टर जमीन : राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील मौजे नाचणे येथे नवीन केंद्रीय विद्यालय स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या नवीन विद्यालयासाठी अडीच हेक्टर जमीन ९९ वर्षांच्या करारावर नाममात्र केवळ १ रुपया भाड्याने देण्यास बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

या निर्णयामुळे रत्नागिरीतील प्रस्तावित केंद्रीय विद्यालयाच्या कामाला आता मोठी गती मिळणार असून कोकणातील होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणखी एक महत्त्वाची सुविधा उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकारने देशात ८५ नवीन केंद्रीय विद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील अकोला आणि रत्नागिरीचा समावेश आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील मौजे नाचणे येथे भारत सरकारच्या केंद्रीय विद्यालय संघटन यांच्या माध्यमातून नवीन केंद्रीय विद्यालय उभारण्यासाठी या जागेची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार मौजे नाचणे येथील सर्वे क्रमांक ९३ मधील अडीच हेक्टर जमीन केंद्रीय विद्यालयाला वर्ग दोन धारणाधिकाराने देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. यामुळे भविष्यात जिल्ह्यात केंद्रीय स्तरावरील शिक्षण सुविधा उपलब्ध होणार आहे.

नाचणे येथील मोक्याच्या ठिकाणी ही जमीन उपलब्ध करून दिल्याने विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षणाची दारे उघडली जातील. रत्नागिरीच्या विकासातील हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. - ना. उदय सामंत, पालकमंत्री
- ना. उदय सामंत, पालकमंत्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT