राज्याचे परिवहनमंत्री आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचे खास विश्वासू अनिल परब यांना शिवसेनेचे नेते, माजी मंत्री रामदास कदम यांनीच ramdas kadam audio clip राजकीयद़ृष्ट्या अडचणीत आणल्याच्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस तथा खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी या क्लिप खेडमध्ये झालेल्या भर पत्रकार परिषदेत ऐकवल्या. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी परब यांची 'ईडी'कडे जी तक्रार केली, त्यासाठी खुद्द रामदास कदम यांनीच रसद पुरवली असल्याचा आरोप या क्लिपच्या आधारे करण्यात आल्याने शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.
हा आवाज माझा नाहीच, असा दावा रामदास कदम यांनी केला असला तरी 'हा आवाज कुणाचा?' हा प्रश्न शिवसेनेसमोर आता उभा ठाकला आहे. कारण आवाज कुणाचाही असला तरी सोमय्या यांना शिवसेनेतूनच रसद पुरवली गेली हे या क्लिपमधील संभाषणातून स्पष्ट झाले आहे.
कथित क्लिपमधील रामदास कदम आणि माहिती हक्क कार्यकर्ते प्रसाद कर्वे यांच्यातील संभाषण
रामदास कदम : हॅलो.
प्रसाद कर्वे : भाई, ते अनिल परबचं कार्यालय तोडायची ऑर्डर झालीय.
रामदास कदम : कुठलं कार्यालय?
प्रसाद कर्वे : वांद्य्राचं कार्यालय होतं बघा, म्हाडाच्या दोन इमारतीमधलं.
रामदास कदम : वाह! व्हेरी गुड… व्हेरी गुड!
प्रसाद कर्वे : लोकायुक्तांनी ऑर्डर दिलीय, एक महिन्याच्या आत बांधकाम पाडून टाकावं.
रामदास कदम : मग त्याच्यावर गुन्हाही दाखल होईल ना?
प्रसाद कर्वे : हो. गुन्हाही दाखल होणार.
रामदास कदम : गुन्हा दाखल झाला तर राजीनामा द्यावा लागेल मग.
प्रसाद कर्वे : हो हो.
रामदास कदम : गुन्हा दाखल झाला ना तर मग त्याला रिझाईन
द्यावा लागेल ना.
प्रसाद कर्वे : होय होय.
रामदास कदम : असं काय?
प्रसाद कर्वे : हो.
रामदास कदम : व्हेरी गुड व्हेरी गुड. त्याची कॉपी आहे का तुझ्याकडे?
प्रसाद कर्वे : नाही. आज ऑर्डर झालीय. पण दोन दिवसांनी कॉपी मिळेल.
रामदास कदम : ओके ओके.
प्रसाद कर्वे : हां हां.
रामदास कदम : ऑर्डर झाली तर अनधिकृत बांधकाम केलं म्हणून गुन्हाही दाखल करावा लागेल. एमआरटीपीच्या माध्यमातून गुन्हा होईल ना दाखल?
प्रसाद कर्वे: हो हो, होईल ना. होईल ना. करणार आहे तो.
रामदास कदम : हम्म.
प्रसाद कर्वे : किरीट सोमय्या करणार आहे.
रामदास कदम : ओके ओके ओके ओके.
रामदास कदम : हॅलो, कुठे आहे?
प्रसाद कर्वे : आहे, दापोलीत आहे.
रामदास कदम : आला का किरीट सोमय्या आला?
प्रसाद कर्वे : हो आलाय.
रामदास कदम : मग तू कधी येणार आहे त्याला घेऊन?
प्रसाद कर्वे : तो मला त्याचा कार्यक्रम संपला की फोन करणार आहे.
रामदास कदम : पण मग तिथून निघताना मला फोन लाव.
प्रसाद कर्वे : हो लावतो.
रामदास कदम : …म्हणजे मी इथं कुणाला थांबवणार नाही ना?
प्रसाद कर्वे : हो चालेल… चालेल.
रामदास कदम : कालची मिटिंग छान झाली ना?
रामदास कदम : हॅलो!
प्रसाद कर्वे : भाई, प्रसाद बोलतो.
रामदास कदम : हा बोल.
प्रसाद कर्वे : महावितरणचं कनेक्शन घेतलंय त्याने अनिल परबच्या नावाने.
रामदास कदम : हो ना?
प्रसाद कर्वे : हो. तुम्हाला पाठवलंय बघा.
रामदास कदम : हो. पण तो नाही बोलतो ना. माझा काही संबंध नाही बांधकामाशी म्हणतो.
प्रसाद कर्वे : विभा साठे उद्या येऊन फौजदारी गुन्हा दाखल करतोय पोलिस स्टेशनला. दोघांच्या विरुद्ध…
रामदास कदम : अॅफिडेव्हिट करायला पाहिजे त्यांनी..प्रसाद कर्वे : हो केलं… नोटरी केलं त्यांनी.
रामदास कदम : मग काही अडचण नाही.
प्रसाद कर्वे : त्याने नोटरी केली… आता तो गुरुवारी येऊन फौजदारी गुन्हा दाखल करतोय. किरीट सोमय्या घेऊनच येतोय त्याला.
रामदास कदम : तो येईल, अडचणीत येईल. 100 टक्के अडचणीत येईल. मी येतो 23 ला संध्याकाळी
प्रसाद कर्वे : हो हो.. ठिकंय. चालेल.
किरीट सोमय्या : अरे भाऊ, मध्यंतरी तू पाठवली होती ना लिस्ट ती परत पाठव. कारण मी आता आलोय अलिबागला. ती लिस्ट माझ्या ऑफिसमध्ये मुंबईला आहे.
प्रसाद कर्वे : हा पाठवतो पाठवतो.
किरीट सोमय्या : ती पूर्ण दापोली तालुक्याची आहे की…
प्रसाद कर्वे : पूर्ण दापोली तालुक्याची आहे.
किरीट सोमय्या : दापोली तालुक्यातील म्हणजे अंजर्ले, हर्णे समुद्र किनार्यावरील गावची मुख्यत्वे.
प्रसाद कर्वे : सीआरझेडमधली… सीआरझेडमधली.
किरीट सोमय्या : कारण का ते दिल्लीवाले मागवतात ना माझ्याकडून.
प्रसाद कर्वे : हो बरोबर बरोबर.
किरीट सोमय्या : आता हे जे काढून दिले आहेत. ते म्हणतात, ऐसा लिखा है हमको आंख खुल गई.
प्रसाद कर्वे : (हसण्याचा आवाज)
किरीट सोमय्या : आणि आता जिल्हाधिकारीपण.
प्रसाद कर्वे : घाबरलाय.
किरीट सोमय्या : हा म्हणजे मी ते शब्द नाही वापरू शकत ना?
प्रसाद कर्वे : बरोबर बरोबर.
किरीट सोमय्या : जो गैरकानुनी है वो गैरकानुनी रहेगा ।
प्रसाद कर्वे : बरोबर आहे. बरोबर आहे.
किरीट सोमय्या : अब उनको जवाब देना पडेगा । उद्या मी दापोलीला येणार आहे. चला बघूया. म्हणून ती लिस्ट पाहिजे होती.. मी बोललो ना?
प्रसाद कर्वे : पाठवतो पाठवतो.
प्रसाद कर्वे : उनका अनिल परब का कार्यालय का निकाल लगा है ना? कार्यालय म्हाडा अनधिकृत कार्यालय.
किरीट सोमय्या : हो हो.. लागला. त्याची ऑर्डर झाली. परवा हिअरिंगमध्ये संपला की आपण जिंकलो. आणि म्हाडाने एका महिन्यात .. करायचं मान्य केलं
प्रसाद कर्वे : अच्छा अच्छा अच्छा.
किरीट सोमय्या : पण काय आहे, त्याची ऑर्डर जी असते ना ती साईन करून येणार मग ती सोशल मीडियामध्ये टाकणार, मीडियाला देणार.
प्रसाद कर्वे : कळलं कळलं.
किरीट सोमय्या – ऑर्डर झाली डिक्टेट. म्हाडाने कारवाई सुरू केली. परंतु दोन दिवसांत येणार तर दोन दिवसांत काय फरक पडतोय.
प्रसाद कर्वे : काय नाही फरक पडत. बरोबर आहे.
किरीट सोमय्या : म्हणून मी मुद्दाम कमेंट करत नाही.
प्रसाद कर्वे : ठिकंय ठिकंय.
किरीट सोमय्या : पण झालं, त्याचं कार्यालय तोडायचा आदेश झाला.