मुंबई : पुढारी वृत्तसेवा
लव्ह जिहाद रोखण्यासाठी राज्यातील महायुती सरकारने कायदा बनविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याला महाविकास आघाडीतील नेत्यांकडून विरोध सुरू झाला असतानाच महायुतीचा घटक पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही अशा कायद्याला विरोध असल्याचे म्हटले आहे. हिंदू-मुस्लिम मुले-मुली एकत्र आले, की त्याला लव्ह जिहाद म्हणणे योग्य नाही, असे म्हणत रामदास आठवले यांनी 'लव्ह जिहाद' या शब्दाला विरोध दर्शविला आहे.