राज ठाकरे. (file photo)
मुंबई

Raj Thackeray : माझ्या वाढदिवशी शिवतीर्थावर येऊ नका, कारण...; राज यांची मनसैनिकांना कळकळीची विनंती

कोणतेही अर्थ काढू नका, राज ठाकरे असे का म्हणाले?

दीपक दि. भांदिगरे

Raj Thackeray letter to MNS workers

मुंबई : येत्या १४ जून रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे. पण माझ्या वाढदिवसाच्या दिक्शी भेटता येणार नसल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. 'या वर्षी शिवतीर्थावर येऊ नका, आपण लवकर भेटू', असे आवाहन त्यांनी महाराष्ट्र सैनिकांना आणि हितचिंतकांना केले आहे. त्यांनी याबाबत X ‍‍वर पोस्ट केली आहे.

राज ठाकरे यांनी लिहिलेले पत्र वाचा जसेच्या तसे....

''तमाम महाराष्ट्र सैनिकांनो आणि हितचिंतकांनो,

सस्नेह जय महाराष्ट्र!

येत्या १४ जून २०२५ ला म्हणजे अर्थातच माझ्या वाढदिवसाच्या दिक्शी आपली भेट होणं शक्य नाही, कारण या दिक्शी मी सहकुटुंब मुंबई बाहेर जात आहे. तुमच्या आणि किंवा इतरांच्या मनात हा प्रश्न येईल की मी वाढदिवस साजय का करणार नाहीये? काही विशेष कारण आहे का? इत्यादी... पण मनापासून सांगतोय की बरतर असं कोणतंच कारण नाहीये. त्यामुळे येत्या १४ जूनला तुम्हाला भेटता येणार नाही, याचे कोणतेही अर्थ काढू नका.

गेली अनेक दशके माझ्या वाढदिवसाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही सगळेजणं येता. तुमच्याशी त्या दिवशी बोलणं होत नाही. पण तुमचं दर्शन, तुमच्या अनेकांशी होणारी भेट ही ऊर्जा देणारी असते. मी आयुष्यात सर्वात जास्त काही कमावलं असेल तर तुम्हा सर्वांच अफाट प्रेम! आणि या प्रेमाबद्दल मी तुमचा आयुष्यभर ऋणी आहे आणि पुढेदेखील राहीन. या वाढदिवसाला तुमची भेट होणार नाही, यामुळे त्याची मला रुखरुख लागेलच!

पण लवकरच मी तुमच्या भेटीला येईन. महाराष्ट्र सैनिकांना भेटायला, त्यांचं दर्शन घ्यायला म्हणून मी येईन तेव्हा आपली भेट होईलच. बाकी तुमच्या शुभेच्छा माझ्यासोबत आहेतच आणि त्या कायम राहतील याबद्दल तिळमात्र शंका माझ्या मनात नाही.

माझ्या वाढदिवसाच्या दिक्शी तुम्ही तुमच्या भागात काही लोकोपयोगी कार्यक्रम राबवलेत तरी माझा वाढदिवस तुम्ही साजरा केलात असं मी मानेन.

त्यामुळे या वर्षी शिवतीर्थावर येऊ नका, आपण लवकर भेटू. महाराष्ट्राची, मराठी माणसाची तसेच तुमची आणि तुमच्या कुटुंबीयांची काळजी घ्या.''

आपला नम्र

राज ठाकरे, अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT