मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. पालिका निवडणुकांच्या प्रचारात एकमेकांविरोधात हल्लाबोल करणाऱ्या या दोन्ही नेत्यांच्या या भेटीने राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे.
राज ठाकरे बुधवारी दुपारी अचानक एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी दाखल झाले. यावेळी शिंदेंनी राज ठाकरेंचा सत्कार केला. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. महापालिका निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये राज ठाकरे यांनी महायुती सरकारवर टीकेची झोड उठविली होती. विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेला त्यांनी लक्ष्य केले होते. शिवाय,
दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीसाठी राज यांनी महायुती आणि त्यातही एकनाथ शिंदेंच्या गाठीभेटी बंद कराव्यात, असा सूर ठाकरे गटाकडून आळविला गेला होता. मात्र, आता पालिका निवडणुका सरल्यानंतर आणि त्या निवडणुकांच्या निकालानंतर राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत. ठाकरे-शिंदे भेटीमुळे काही नवी राजकीय रणनीती आकाराला येणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.