मुंबई

Raj Thackeray : राज ठाकरे दुसऱ्यांदा झाले आजोबा! अमित-मिताली यांना कन्यारत्न

कन्यारत्नाचे आगमन झाल्याने सध्या 'शिवतीर्थ'वर राजकीय चर्चा बाजूला ठेवून केवळ कौटुंबिक जल्लोष

पुढारी वृत्तसेवा

मुंबई :आगामी गणेशोत्सवाच्या धामधुमीतच मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या घरी एका चिमुकल्या परीच्या रूपाने गोड बातमी आली आहे. राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे आणि त्यांच्या पत्नी मिताली यांना मुलगी झाली आहे. या नव्या पाहुणीच्या आगमनाने ठाकरे परिवारात सध्या उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पसरले आहे.

कुटुंबाचा विस्तार: मुलापाठोपाठ आता लेक

जानेवारी २०१९ मध्ये विवाहबंधनात अडकलेल्या अमित आणि मिताली बोरुडे-ठाकरे यांना एप्रिल २०२२ मध्ये पहिला मुलगा, 'किआन' झाला होता. आता किआनच्या जन्मानंतर ठाकरेंच्या घरात दुसऱ्यांदा पाळणा हलला असून, लेकीच्या जन्मामुळे राज ठाकरे पुन्हा एकदा आजोबा झाले आहेत. या आनंदाच्या प्रसंगी ठाकरे कुटुंबीयांवर विविध क्षेत्रांतून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.

राजकीय वर्तुळातील सक्रिय चेहरा

मराठी भाषेचा आग्रह आणि जनसामान्यांच्या हितासाठी मनसेच्या आघाडीवर सातत्याने कार्यरत राहणारे अमित ठाकरे राजकीय क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत आहेत. २०२४ मधील माहीम विधानसभा निवडणुकीतील चुरशीच्या लढतीदरम्यान त्यांची पत्नी मिताली यांनीही प्रत्यक्ष मैदानात उतरून महिला मतदारांशी संवाद साधत प्रचारात मोलाची साथ दिली होती.

नुकतेच पुण्याच्या तंत्रनिकेतन महाविद्यालयातील फलकावरील छायाचित्रांच्या स्थानावरून त्यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे ते चर्चेत राहिले होते. या राजकीय आणि सामाजिक धावपळीच्या दरम्यान, घरात कन्यारत्नाचे आगमन झाल्याने सध्या 'शिवतीर्थ'वर राजकीय चर्चा बाजूला ठेवून केवळ कौटुंबिक जल्लोष पाहायला मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT