Mumbai Rain : नवी मुंबईत अखेर पावसाची हजेरी, नागरिकांना मोठा दिलासा  file photo
मुंबई

Mumbai Rain : नवी मुंबईत अखेर पावसाची हजेरी, नागरिकांना मोठा दिलासा

गेल्या 24 तासात नवी मुंबईत सरासरी 05.08 मी.मी. पाऊस झाला.

पुढारी वृत्तसेवा

Rain finally arrives in Navi Mumbai; huge relief for residents

नवी मुंबई: पुढारी वृत्तसेवा सकाळपासून आकाशात ढगाळ वातावरण दिसून येत आहे. नवी मुंबईसह उरण, पनवेल तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. नवी मुंबईत अखेर पावसाने हजेरी लावली असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गेल्या 24 तासात नवी मुंबईत सरासरी 05.08 मी.मी. पाऊस झाला. तर मोरबे धरण क्षेत्रात 19.20 मीमी पावसाची नोंद करण्यात आली. मोरबे धरणाची पाणी पातळी ही 69.48 मीटर (26.40 %) एवढी आहे. शहरात एका ठिकाणी झाड कोसळले तर तीन ठिकाणी आगीच्या घटना घडल्या.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने सर्वच चिंतेत होते. नवी मुंबईत भीषण पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत होता. मात्र कालपासून सुरू झालेल्या पावसामुळे नवी मुंबईकरांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. मोरबे धरण क्षेत्रात कालपासून पाऊस सक्रिय झाला. रायगड जिल्ह्यात नवी मुंबई महापालिकेच्या मालकीचे धरण आहे. धरणात ऑगस्टपर्यंत पुरेल एवढा पाण्याचा साठा शिल्लक आहे. यामुळे पाऊस वेळेवर पडला नाहीतर धरण कोरडे पडेल की काय अशी भिती व्यक्त केली जात होती.

पाणीटंचाईमुळे पाणी कपातीचा निर्णय महापालिकेला घ्यावा लागला. तरणतलाव, वॉशिंग सेंटर, बांधकाम साईडवरील पाणी पुरवठा बंद करण्यात आला. पाणी चोरीविरोधात पथक तयार करून कारवाई सुरु केली. यामुळे पाणीटंचाई स्पष्टपणे दिसून येत आहे. मात्र कालपासून पाऊस सक्रिय झाला असून रायगड जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. मोरबे धरण क्षेत्रात ही कालपासून पावसाला सुरुवात झाली. यामुळे आता काही अंशी का असेना पण दिलासा मिळेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बेलापूर - 09.10 मीमी

नेरूळ - 06.60 मीमी

वाशी - 02.60 मीमी

कोपरखूरणे - 08.40 मीमी

ऐरोली - 02.00 मीमी

दिघा- 02.80 मीमी

------------------------------------------

सरासरी - 05.08 मीमी

आतापर्यंत 1 जूनपासून झालेला पाऊस - 09.85 मीमी

मोरबे धरण

एकूण पाऊस:- 19.20 मीमी

एकूण पाऊस 1 जून ते आतापर्यंत 25.20 मीमी

पातळी 69.48 मी (26.40 %)

घटना

आगीच्या घटना- 03

झाड पडणे 01

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT