Anant Ambani-Radhika Merchant Wedding
विदाईवेळी राधिका आपल्या वडिलांना आलिंगन देऊन रडू लागली  ambani_update Instagram
मुंबई

राधिका मर्चंट वडिलांना बिलगडून रडली; भावूक करणारा विदाईचा व्हिडिओ

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नातील एक इमोशनल करणारा व्हिडिओ समोर आला आहे. मंडपमध्ये येताच राधिका तिचे वडील वीरेन मर्चंट यांना बिलगून रडू लागली. अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे रॉयल वेडिंग सध्या चर्चेत आहे. अनंत-राधिकाच्या लग्नाचे फंक्शन १४ जुलैपर्यंत सुरु राहिले होते. अनंत अंबानी आणि राधिकाच्या लग्नात देश-विदेशातील स्टार्सचे शानदार फोटो आणि व्हिडिओज हळूहळू समोर येत आहेत. जे सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

अनंत अंबानी यांची पत्नी राधिका यांचा एक इमोशनल व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये तिचे वडील वीरेन मर्चंट आपल्या मुलीला आलिंगन देऊन भावूक झालेले दिसत आहेत. तर राधिका देखील रडताना दिसते.

राधिका मर्चेंटला अश्रू अनावर

अनंत अंबानी-राधिकाच्या लग्नातील काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. शुक्रवार, १२ जुलैला हे कपल विवाह बंधनात अडकले. लग्नातील समोर आलेल्या काही व्हिडिओंमध्ये राधिका आपल्या वडिलांना भेटून रडत असल्याचे दिसत आहे. तर राधिकाचे वडील वीरेन मर्चंटदेखील आपल्या मुलीला पाहून भावूक होताना दिसत आहेत. नंतर राधिकाला सावरताना आणि शांत करताना ते दिसत आहेत.

अनंत-राधिकाचा भावूक करणारा व्हिडिओ

लग्नासाठी राधिकाने अबू जानी संदीप खोसलाचा डिझाईन केलेला ड्रेस परिधान केला होता. सेलिब्रिटी फॅशन स्टायलिस्ट रिया कपूरने राधिकाची नववधू स्टाईल केली होती. दुसरीकडे अनंत अंबानीचा लग्नाचा ड्रेस सेलिब्रिटी फॅशन स्टायलिस्ट शालीना नैथानीने स्टाईल केला होता.

अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे शाही लग्न

१२ जुलै रोजी अनंत अंबानी आणि राधिका यांचे लग्न जियो वर्ल्ड सेंटरमें पार पडले. मागील वर्षी २९ डिसेंबर रोजी अनंत अंबानी आणि राधिकाचा साखरपुडा सोहळा राजस्थानमध्ये पार पडला होता.

video-ambani_update video वरून साभार

SCROLL FOR NEXT