पुढारी ऑनलाईन डेस्क: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अंधेरी येथे ठाकरे गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. लाज असेल तर ईव्हीएम बाजूला करा आणि एक तरी निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा, असे आव्हान यावेळी उद्धव ठाकरेंनी विरोधकांना दिले.
मेळाव्यामध्ये बोलताना उध्दव ठाकरे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. अमित शहांमुळे गद्दारांचा विजय झाला आहे. त्यांनी सर्व यंत्रणांचा वापर करून निवडणूका जिंकल्या आहेत. महाराष्ट्र त्यांना कधीही माफ करणार नाही. शहांनी आमच्या नादाला लागू नये. अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही ठाकरे यांनी यावेळी दिला.
महाराष्ट्र धर्म देशाचं आणि धर्माचं रक्षण करतो. आम्ही हिंदू आहोतच. पण महाराष्ट्र आणि मराठीच्या आड येणार नाही. तुम्ही हिंदूंच्या आड आला तर आम्ही कडवट हिंदू म्हणून तुमच्यासमोर आल्याशिवाय राहणार नाही. असेही ते म्हणाले.
विधानसभा निवडणूकांमध्ये झालेल्या पराभवाचा सूड घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. असे उद्धव ठाकरेंनी ठामपणे सांगितले. ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली अशा सर्वांचा कठोर शब्दांत त्यांनी समाचार घेतला.