देवनार डम्पिंगवरील हालचालींवर राहणार बारीक लक्ष pudhari photo
मुंबई

CCTV Monitoring at Deonar Landfill : देवनार डम्पिंगवरील हालचालींवर राहणार बारीक लक्ष

पीटीझेड कॅमेरेही बसवणार, डिजिटल वायरलेस वॉकीटॉकी संचही भाडेतत्त्वावर घेणार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : देवनार डम्पिंग ग्राउंडवर आता प्रशासनाची बारीक नजर राहणार आहे. कचरा जाळणे, अनधिकृत प्रवेश करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी रस्त्यावर पिटीझेड कॅमेरा बसवण्यात येणार आहे. त्याशिवाय डिजिटल वायरलेस वॉकीटॉकी संचही भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत.

मुंबई शहरातील कचरा देवनार डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो. या कचऱ्यासोबत काही मौल्यवान वस्तूही येतात. त्या वेचण्यासाठी डम्पिंग ग्राउंडवर मोठ्या प्रमाणात कचरा वेचक येतात. यावेळी काहीजण डम्पिंग ग्राउंडमधील कचऱ्याला आगी लावतात. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधीयुक्त धूर पसरून प्रदूषणामध्ये वाढ होते. येथे घुसखोरीचे प्रमाणही वाढले आहे.

यात गर्दुल्ल्यांसह भिकारी यांचा समावेश असून अनैतिक धंदे या ठिकाणी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे डम्पिंग ग्राउंड अधिक सुरक्षित करण्यासाठी पुरेसा उजेड रहावा, यासाठी प्रखर दिवे बसवण्यात आले आहेत. त्याशिवाय ठिकठिकाणी सीसीटीव्हीही बसवण्यात आले आहेत.

डम्पिंग ग्राउंडची अधिक सुरक्षा व्हावी यासाठी अतिरिक्त सीसीटीव्हींसह पिटीझेड कॅमेऱ्याची सेवा सुरू करण्यात येणार आहे. यामुळे डम्पिंग ग्राउंडमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. डम्पिंग ग्राउंडवर एखाद्याने प्रवेश केल्यानंतर त्याची माहिती तातडीने सुरक्षा यंत्रणेला व्हावी यासाठी डिजिटल वायरलेस वॉकी टॉकी भाडेतत्त्वावर घेतले जाणार आहेत. यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे.

पीटीझेड कॅमेऱ्याची प्रमुख वैशिष्ट्ये

  • कॅमेरा डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे फिरू शकतो.

  • कॅमेरा वर व खालच्या दिशेने वळू शकतो.

  • झूम लेन्सद्वारे लांबच्या वस्तूचे स्पष्ट चित्र मिळवता येते.

  • हे कॅमेरे रिमोट, सॉफ्टवेअर किंवा स्वयंचलित पद्धतीने नियंत्रित केले जाऊ शकतात.

  • हे कॅमेरे मोठ्या जागा, जसे की पार्किंग, गोदामे, लष्करी तळ किंवा मोठ्या संमेलनात 360-अंशाच्या कव्हरेजसाठी वापरले जातात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT