मुंबई

Property Card Changes : प्रॉपर्टी कार्डमधील फेरफार होणार आता ऑनलाईन', मंत्री बावनकुळे यांची माहिती

Chandrashekhar Bawankule : 45 प्रकारच्या अर्जांसाठी विशेष पोर्टल

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील मिळकतपत्रिकांचे (प्रॉपर्टी कार्ड) फेरफार आता पूर्णपणे ऑनलाईन होणार आहेत. यामुळे सुमारे 30 लाख नागरिकांना कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची गरज भासणार नाही, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी विधानसभेत केली.

बावनकुळे यांनी विधानसभेत निवेदन करताना सांगितले की, मुंबई शहर आणि उर्वरित महाराष्ट्रातील प्रॉपर्टी कार्ड संधारणाची पद्धत वेगळी असल्याने मुंबईत संगणकीकरणात काही तांत्रिक अडचणी होत्या. मात्र, जनतेची वाढती मागणी लक्षात घेऊन शासनाने यावर मार्ग काढला आहे.

आता मुंबईतील 19 महसूल विभाग आणि 4 नगररचना योजनांमधील एकूण 27 हजार 847 संगणकीय मिळकतपत्रिका नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. फेरफारासाठी अर्ज करण्यासाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. या पोर्टलमुळे नागरिकांना घरबसल्या अर्ज भरता येणार असून, त्यांच्या अर्जाची सद्यस्थिती काय आहे, याची माहिती मेसेजद्वारे मोबाईलवर मिळणार आहे. या पारदर्शक प्रणालीमुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि कामात गती येईल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.

मुंबईत प्रथमच तब्बल 45 प्रकारच्या फेरफारांसाठी ऑनलाईन अर्जाची सुविधा देण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने खरेदीखत, वारस नोंद, बक्षीसपत्र, भाडेपट्टा, गहाणखत, रोड सेटबॅक, आरक्षण आणि भूसंपादन प्रक्रिया यांचा समावेश आहे. नागरिकांनी आता आपल्या मालमत्तेच्या कामांसाठी ारहरलर्हीाळ.र्सेीं.ळप किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळाचा वापर करावा, असे आवाहनही बावनकुळे यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT