नवी मुंबई : पुढारी वृत्तसेवा
एपीएमसी सभापती आणि उप सभापती निवडणूक बिनविरोध झाली. सभापती आणि उप सभापती पदासाठी एक-एक अर्ज दाखल झाले. एपीएमसीच्या चौथ्या मजल्यावर सभागृहात निवडणूक बैठक पार पडली.
या बैठकीत प्रभू पाटील यांची सभापतीपदी तर हुकूमचंद आमदारे यांची उपसभापतीपदी निवड झाली. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मंत्री गणेश नाईक आणि विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांची भूमिका महत्वाची ठरली.