Mumbai Municipal Corporation Elections Pudhari
मुंबई

BMC Committee Chairs | मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी प्रभाकर शिंदे, शिक्षण समिती अध्यक्षपदी राजश्री शिरवडकर बिनविरोध

BMC Standing Committee Chairman | महापौर रितू तावडे यांची घोषणा

पुढारी वृत्तसेवा

Mumbai Municipal Corporation Elections

मुंबई : स्थायी समितीचे अध्यक्षपदी भाजपाचे प्रभाकर शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. महापौर रितू तावडे यांनी शिंदे यांची घोषणा करतात जय श्रीरामच्या घोषणा दुमदुमल्या. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जयजयकार करण्यात आला.

स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने माघार घेतल्यामुळे शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, महापालिका सचिव मंजिरी देशपांडे व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शिंदे यांच्या निवडून नंतर माजी महापौर ठाकरे गटाच्या ज्येष्ठ नगरसेविका श्रद्धा जाधव यांच्यासह विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांच्यासह त्यांच्या सहकारी नगरसेवकांनी पुष्पगुच्छ देऊन शिंदे यांचे अभिनंदन केले. भाजपाच्या वतीने सभागृह नेते गणेश खणकर तर शिवसेनेच्या वतीने अमेय घोले यांनी शिंदे यांचे अभिनंदन केले.

शिक्षण समिती अध्यक्षपदी राजेश्री शिरवडकर

मुंबई महानगरपालिका शिक्षण समिती अध्यक्षपदी भाजपाच्या राजेश्री राजेश शिरवडकर यांची बिनविरोध निवड करण्‍यात आली. पीठासीन अधिकारी महापौर रितू तावडे यांनी या बिनविरोध निवडीची घोषणा केली. 

यावेळी सदस्यांनी बाप का वाजवत शिरवाडकर यांचे अभिनंदन केले. यावेळीउप आयुक्‍त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, महानगरपालिका सचिव मंजिरी देशपांडे यांच्‍यासह शिक्षण समिती सदस्‍य उपस्थित होते. शिक्षण समितीवर २२ नगरसेवक आणि ४ बिगर महानगरपालिका सदस्यांची नामनिर्देशानुसार नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT