प्रभाकर शिंदे Pudhari
मुंबई

BMC Standing Committee Chairman | स्थायी समिती अध्यक्षपदी प्रभाकर शिंदे यांच्या नावाची घोषणा

Mumbai Municipal Corporation News | शिक्षण समिती राजश्री शिरवाडकर, सुधार संध्या दोषी, बेस्ट तृष्णा विश्वासराव

पुढारी वृत्तसेवा

Prabhakar Shinde Standing Committee Chairman

मुंबई : अखेर स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे यांचे नाव घोषित झाले आहे. ते आपला उमेदवारी अर्ज आज दाखल करणार आहेत. त्याशिवाय शिक्षण समिती अध्यक्ष पदासाठी भाजपच्या राजश्री शिरवाडकर, सुधार समितीसाठी शिवसेनेच्या संध्या दोषी व बेस्ट समितीसाठी शिवसेनेच्या तृष्णा विश्वासराव यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

हे तिघेही थोड्याच वेळात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे भाजपा शिवसेना महायुतीमध्ये स्थायी व शिक्षण या दोन वैधानिक समित्या भाजपाकडे गेल्या असून सुधार व बेस्ट समिती शिवसेनेकडे सोपवण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT