Central Railway night block Pudhari
मुंबई

Central Railway night block: मुंबईकरांनो लक्ष द्या! आज, उद्या ‌‘मरे’वर रात्रकालीन ब्लॉक

हा ब्लॉक भायखळा-दादर स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या व जलद मार्गावर असेल.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: प्रभादेवी येथील ब्रिटिशकालीन उड्डाणपुलाच्या जागी नवीन दुमजली उड्डाणपूल उभारण्यात येत असल्याने या उड्डाणपुलाच्या कामासाठी मध्य रेल्वेवर बुधवारी आणि गुरुवारी रात्रकालीन ब्लॉक घेतला आहे. हा ब्लॉक भायखळा-दादर स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या व जलद मार्गावर असेल.

बुधवारी मध्यरात्री 12.30 ते गुरुवारी पहाटे 4.30 पर्यंत, तसेच गुरुवारी मध्यरात्री 12.30 ते शुक्रवारी पहाटे 4.30 पर्यंत ब्लॉक असेल. या ब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

प्रभादेवी उड्डाणपूल 112 वर्षांहून अधिक काळ दक्षिण मुंबईतील वाहतुकीसाठी एक महत्त्वाचा भाग होता. मात्र या ठिकाणी आता नवा उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला. जुन्या प्रभादेवी उड्डाणपुलाचे पाडकाम सप्टेंबर 2025 मध्ये हाती घेण्यात आले आहे.

परिणाम काय?

बुधवारी रात्रकालीन ब्लॉक कालावधीत गाडी क्रमांक 12810 हावडा - सीएसएमटी मेल आणि गाडी क्रमांक 12134 मंगळूर सीएसएमटी एक्स्प्रेस या रेल्वेगाड्या दादर स्थानकावर 20 ते 25 मिनिटे थांबविण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक 11020 भुवनेश्वर सीएसएमटी कोणार्क एक्स्प्रेसला दादर स्थानकावर दुहेरी थांबा देण्यात येणार आहे.

गुरुवारी रात्रकालीन ब्लॉक कालावधीत गाडी क्रमांक 11020 भुवनेश्वर -सीएसएमटी कोणार्क एक्स्प्रेस, गाडी क्रमांक 12810 हावडा सीएसएमटी मेल आणि गाडी क्रमांक 12134 मंगळुरू - सीएसएमटी एक्स्प्रेस या रेल्वेगाड्यांना दादर स्थानकावर दुहेरी थांबा देण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT