Powai Lake Water Pudhari
मुंबई

Powai Lake Water: पवई तलावाचे पाणी पिण्यासाठी वापरणार!महापालिका तांत्रिक बाबी तपासणार

पवई तलाव पुनरुज्जीवनाचे काम सुरू; आधुनिक जलशुद्धीकरण तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा विचार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: पवई तलावातील पाण्याचा वापर पिण्यासाठी करण्याचा विचार मुंबई महानगरपालिकेचा आहे. याबाबत तांत्रिक बाबी तपासून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यात वाढ होऊन पाणी टंचाई दूर होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

पवई तलावा मुंबई उपनगरातील एक प्रमुख तलाव असून तलावाचे जलक्षेत्र सुमारे ५५७ एकर असून त्याचा परीघ सुमारे १०.२ किलोमीटर इतके आहे.

या तलावातील पाणी पिण्यायोग्य नसल्यामुळे त्याचा वापर आरे मिल्क डेअरी साठी बांधकाम व जनावरांच्या खाद्यासाठी तसेच एल अँड टी कंपनीत औद्योगिक वापरासाठी देण्यात येते. सध्या १०.३ दशलक्ष लिटर म्हणजेच १ कोटी लिटर पेक्षा जास्त प्रतिदिन इतक्या प्रमाणात पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. सध्या तलावातील पाण्याच्या पृष्ठभागावरील जलपर्णी वनस्पती तरंगणाऱ्या तसेच जमिनीतून उगवलेल्या वनस्पती काढल्या जात आहेत.

पवई तलाव पुनरुज्जीवन संदर्भातील कामे सुरू आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर तलावातील पाण्यासाठी आधुनिक जलशुद्धीकरण तंत्रज्ञान राबवणे अथवा अद्ययावत जलशुद्धीकरण केंद्र उभारणे, तलावातील पाण्याचा संभाव्य वापर पिण्यासाठी अथवा अन्य नागरी वापरासाठी तातडीने उपलब्ध करून देणे याबाबत तांत्रिक बाबी तपासण्यात येणार असल्याचे पालिकेच्या जल अभियंता विभागाकडून सांगण्यात आले.

तांत्रिक बाबी तपासल्यानंतर पाणी पिण्यायोग्य असेल तर त्याचा पुरवठा मुंबईकरांना करण्यात येईल असेही सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT