Maritime Leaders Conference
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी (दि.२९) महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते मुंबईतील नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित ‘इंडिया मेरीटाईम वीक २०२५’ मध्ये ‘मेरीटाईम लीडर्स परिषदे’ला उपस्थिती लावतील आणि संबोधित करतील. ग्लोबल मेरीटाईम सीईओ फोरमचे ते अध्यक्षपद भूषवतील.
‘इंडिया मेरीटाईम वीक २०२५’ मध्ये ८५ हून अधिक देशांतील १ लाखाहून अधिक प्रतिनिधी तसेच ३५० हून अधिक आंतरराष्ट्रीय वक्त्यांचा सहभाग असणार आहे. इंडिया मेरीटाईम वीकचा प्रमुख कार्यक्रम असलेल्या ग्लोबल मेरीटाईम सीईओ फोरममध्ये जगातील सागरी कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रमुख गुंतवणूकदार, धोरणकर्ते आणि आंतरराष्ट्रीय भागीदार जागतिक सागरी परिसंस्थेच्या भविष्यावर चर्चा करण्यासाठी एकत्र येतील. शाश्वत सागरी विकास, लवचिक पुरवठा साखळी आणि समावेशक सागरी अर्थव्यवस्था धोरणांवर संवाद साधण्यासाठी हा मंच एक प्रमुख व्यासपीठ म्हणून काम करेल.