Narendra Modi visit to Mumbai
पंतप्रधान मोदींच्या हस्ते मुंबईत २९ हजार कोटींहून अधिक कामांचा शुभारंभ केला.  file photo
मुंबई

पंतप्रधान मोदींच्या हस्ते मुंबईत २९ हजार कोटींहून अधिक कामांचा शुभारंभ

मोहन कारंडे

मुंबई : पुढारी ऑनलाईन

महाराष्‍ट्राकडे गौरवशाली इतिहास, समृद्ध भविष्‍य आणि कृषी क्षेत्राची क्षमता आहे. अशा महाराष्‍ट्र राज्‍याची विकासाची क्षमता आणखी वाढवण्यासाठी आणि मुंबई तसेच महाराष्‍ट्राला प्रगतीपथावर नेण्याचा सरकारचा प्रयत्‍न आहे. यासाठी अनेक प्रकल्‍प मुंबई तसेच राज्‍यात हाती घेण्यात आले आहेत. या प्रकल्‍पामुळे मुंबई आणि आजुबाजुचा परिसर जोडला जाईल. या प्रकल्‍पामुळे १० लाखांपेक्षा अधिक जणांना रोजगार मिळेल. यामुळे मुंबई आणि उपनगरांमध्ये नागरिकांचा प्रवास सुखकर होणार असल्‍याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्‍हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्‍ते गोरेगाव-मुलुंड जोड रस्‍ता प्रकल्‍पाचं भूमिपूजन करण्यात आले यावेळी त्‍यांनी उपस्‍थित नागरिकांशी संवाद साधला. यावेळी मोदी यांनी मुंबईकरांना मराठीतून नमस्‍कार म्‍हणत आपल्‍या भाषणाला सुरूवात केली. यावेळी त्‍यांनी वारकऱ्यांना वारीच्या शुभेच्छाही दिल्‍या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत २९ हजार ४०० कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या रस्ते, रेल्वे आणि बंदर क्षेत्राशी संबंधित प्रकल्पांचा शुभारंभ केला. ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाचे आणि गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत दुहेरी बोगद्यांचे भूमिपूजन त्यांनी केले. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा शुभारंभही त्यांच्या हस्ते करण्यात आला. लोकमान्य टिळक टर्मिनस येथील नवीन प्लॅटफॉर्मचे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील विस्तारित प्लॅटफॉर्मचे पंतप्रधान मोदींनी राष्ट्राला समर्पण केले.

बोरिवली-ठाणे जुळ्या बोगद्यांचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन

एका बाजूला महामुंबईत मेट्रोचे जाळे सर्वत्र विस्तारत असताना आता रस्तेमार्गे प्रवासही वेगवान होणार आहे. मुंबई ते ठाणे प्रवासाला गती देण्यासाठी १४ हजार कोटींचा गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्यातील जुळ्या बोगद्यांच्या कामाचे भूमिपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या प्रकल्पांतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून प्रत्येकी ४.७ किलोमीटर लांब आणि ४५.७० मीटर रुंदीचे जुळे बोगदे तयार केले जातील. जोड मार्ग आणि अन्य बाबींसह तिसऱ्या टप्प्यातील मार्गाची एकूण लांबी ६.६५ किलोमीटर असेल. हे बोगदे जमिनीखाली २० ते १६० मीटर खोलवर असतील. प्रत्येकी ३०० मीटर अंतरावर दोन्ही बोगदे एकमेकांशी जोडले जातील. सुमारे १४.२ मीटर व्यासाचा बोगदा खोदण्याच्या संयंत्राने बोगद्याचे खोदकाम केले जाईल.

नवी मुंबईतील तुर्भे येथे गती शक्ती मल्टीमॉडल

कार्गो टर्मिनल आणि कल्याण यार्ड रिमॉडेलिंगची पायाभरणी, एलटीटी येथील नवीन प्लॅटफॉर्म आणि सीएसएमटी स्थानकातील विस्तारीत प्लॅटफॉर्म १०-११ पंतप्रधान मोदी यांनी आज देशाला अर्पण केला. महामुंबईत आठ ठिकाणी तर राज्यातील पुणे, भुसावळ, नागपूर आणि सोलापूर विभागात देखील 'गतिशक्ती मल्टिमॉडेल कार्गो टर्मिनल' उभारण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. यामुळे शेतमाल आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची वेगवान आणि किफायतशीर दरात वाहतूक होणार आहे.

SCROLL FOR NEXT