मुंबई : दरवर्षी फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाकडून (पीसीआय) मान्यता मिळण्यात होणाऱ्या विलंबामुळे अनेकदा प्रवेशप्रक्रिया उशिरा सुरू व्हायची. परंतु आगामी २०२६-२७या शैक्षणिक वर्षापासून प्रवेश वेळेत सुरू होण्यासाठी पीसीआयने मान्यता प्रक्रिया आजपासून सुरू केली आहे. त्यामुळे पुढील वर्षी तरी फार्मसी प्रवेश वेळेत सुरु होण्याची चिन्हे आहेत.
आगामी शैक्षणिक वर्षामध्ये औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाचे नवीन महाविद्यालय सुरू करण्यास इच्छुक असलेल्या संस्थांना ६ ऑक्टोबरपासून अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी किंवा जागांमध्ये वाढ करण्यासाठी देशातील तसेच राज्यातील संस्थांना ६ ऑक्टोबरपासून पीसीआयच्या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. ही सुविधा पुढील वर्षभर उपलब्ध असणार आहे.
सुरू अर्ज नवीन अभ्यासक्रम करण्यासंदर्भात प्रथमच करणाऱ्या संस्थांना आगामी शैक्षणिक सत्रासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत एसआयएफ, पीईआरसी आणि वैध कागदपत्रे सादर करणे आवश्यक असणार आहेत. पहिल्यांदाच अर्ज करणाऱ्या नवीन संस्थांनी, तसेच नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी किंवा प्रवेशवाढीसाठी मान्यता मिळवू इच्छिणाऱ्या विद्यमान संस्थांनी आगामी शैक्षणिक सत्रासाठी ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत आवश्यक वैधानिक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. मात्र या कालावधीत कागदपत्रे सादर न करणाऱ्या संस्थेचा अर्ज २०२७-२८ या शैक्षणिक वर्षासाठी विचारात घेण्यात येईल. जोपर्यंत ही कागदपत्रे सादर केली जाणार नाही, तोपर्यंत २०२६-२०२७ च्या प्रवेशासाठी अर्जावर प्रक्रिया केली जाणार नसल्याचे पीसीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
काय आहेत निकष....
फार्मसी अॅक्ट, १९४८ अंतर्गत राबवण्यात येणारी ही वार्षिक मान्यता प्रक्रिया 'डिजी-फार्ड'या ऑनलाईन पोर्टलवरूनच पूर्ण करायची आहे.
संस्थेला आवश्यक अधोसंरचना, शिक्षकवर्ग, प्रयोगशाळा आणि मॉडेल फार्मसीची सुविधा ठेवणे
बंधनकारक आहे. विशेषतः डी. (डिप्लोमा इन फार्मसी) अभ्यासक्रमासाठी संस्थेला स्वतंत्र प्रयोगशाळा, किमान ८० चौरस मीटरची मॉडेल फार्मसी, तसेच आवश्यक तांत्रिक उपकरणे आणि शिक्षकवर्ग असणे आवश्यक आहे.
अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर
फार्मसंस्थांची तपासणी पीसीआयकडून केली जाईल. निरीक्षण अहवालानुसार आवश्यक सुधारणा दाखल केल्यानंतरच अंतिम मान्यता दिली जाणार आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे, असे पीसीआयने स्पष्ट केले आहे.