संजय राऊतांविरोधात ईडीच्या याचिकेवर सुनावणीस उच्च न्यायालयाचा नकार
संजय राऊतांविरोधात ईडीच्या याचिकेवर सुनावणीस उच्च न्यायालयाचा नकार 
मुंबई

Patra Chawl land scam : संजय राऊतांविरोधात ईडीच्या याचिकेवर सुनावणीस उच्च न्यायालयाचा नकार

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : मनी लाँड्रिंग प्रकरणातील राज्यसभा खासदार आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विरोधात ईडीची याचिकेवर सुनावणीस उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. मात्र आज न्यायमूर्तीनी सुनावणीस नकार दिल्याने ईडीची पंचाईत झाली आहे. संजय राऊत यांना दि.९ नोव्हेंबर रोजी जामीन मंजूर झाला होता. पण त्यांना दिलेला जामीन रद्द करण्यासाठी ईडीनं (ED- Enforcement Directorate) हायकोर्टात याचिका दाखल केली होती. संजय राऊत यांच्या विरोधात पुरावे असूनही विशेष पीएमएलए न्यायालयानं त्यांना जामीन दिला अशी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र, संजय राऊत यांच्या विरुद्ध याचिकेवरील सुनावणीस उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

काय आहे नेमके प्रकरण

शिवसेना खासदार संजय राऊत यांना गोरेगाव येथील पत्राचाळ ( Patra Chawl land scam case) गैरव्यवहार प्रकरणी ३१ जुलैला अटक करण्यात आली होती. अटकेनंतर त्यांची रवानगी ऑर्थर रोड कारागृहात (Arthur Road Jail) रवानगी करण्यात आली होती. गेले १०० दिवस ते ऑर्थर रोड कारागृहात होते. दि.९ नोव्हेंबर २०२२ रोजी त्यांना जामीन मंजूर झाला. पण, संजय राऊत यांच्या विरोधात पुरावे असूनही विशेष पीएमएलए न्यायालयानं त्यांना जामीन दिला, अशी याचिका ईडीने दाखल केली होती.

Patra Chawl land scam : काय आहे 'ईडी'चा आरोप

ईडीने (ED- Enforcement Directorate) संजय राऊत यांना ३१ जुलै रोजी गोरेगाव येथील पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी अटक केली होती. ईडीचा राऊत यांच्यावर असा आरोप आहे की, संजय राऊतांचे भाऊ प्रवीण राऊत (Pravin Raut) हे पत्राचाळ डेव्हलेपमेंटकडे लक्ष देत होते. तेव्हा प्रवीण यांना एचडीआयएल ग्रुपकडून (HDIL) ११२ कोटी रुपये मिळाले होते. या ११२ कोटी मधील १ कोटी ६ लाख रुपये हे राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यावर पाठवण्यात आले. या पैशांनी त्यांनी अलिबाग येथे जमीन खरेदी केली. त्याचबरोबर पत्राचाळ डेव्हलेपमेंटमध्ये प्रवीण राऊत हे फक्त नाममात्र होते; पण सर्व व्‍यवहार संजय राऊत पाहत होते, असेही ईडीने म्हटले आहे.

मात्र आज न्यायमूर्तीनी सुनावणीस नकार दिल्याने ईडीची पंचाईत झाली आहे. पण संजय राऊत यांना दिलासा मिळाला आहे.

SCROLL FOR NEXT