आषाढी यात्रा काळात विकला जातो २० टन पेढा pudhari photo
मुंबई

Ashadhi Wari 2026 : आषाढी यात्रा काळात विकला जातो २० टन पेढा

दरवर्षी होते लाखो रुपयांची उलाढाल; केशरी पेढ्याला सर्वाधिक मागणी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : स्वप्निल कुलकर्णी

विठुरायाच्या पंढरीत वारकरी चुरमुरे, साखरांड्या, बत्तासे यासारख्या प्रासादिक साहित्यासोबत पेढेदेखील प्रसाद म्हणून आवर्जून घरी नेतात. मंदिरातही दर्शनावेळी विठ्ठल-रुक्मिणीच्या पुढ्यात पेढाच ठेवण्यात येतो.त्यामुळे इथल्या प्रसादाच्या पेढ्चाला वेगळे महत्त्व आहे. पंढरपुरात वर्षभर प्रतिदिन एक टनापर्यंत पेढ्यांची विक्री सुरू असते. मात्र, आषाढी यात्रेच्या कालावधीत पेठ्यांची हीच विक्री तब्बल २० टनांपर्यंत होत असल्याचे पेढे विक्रेते सांगतात.

पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात प्रामुख्याने वट्टमवार, देशपांडे, लटके, वस्ताद पेढेवाले असे सुप्रसिद्ध पेढे विक्रेते आहेत. छोटे-मोठे मिळून पेढा उत्पादक-विक्रेत्यांची संख्या शंभरहून अधिक आहे. सर्व जण स्वतःच उत्पादन आणि विक्रीही करतात. प्रति व्यावसायिक रोज १०० किलो पेढ्यांची विक्री होते, याशिवाय येरमाळा, धारूर, केर या ठिकाणाहूनही पेढे विक्रेते वारीतील ५ दिवस पेढे विक्री करण्यासाठी येतात. पंढरपूरच्या पेढा निर्मिती, प्रकार व चवीत विविधता व खासियत आहे.

पंढरपूरच्या ग्रामीण परिसरात अनेक खवा उत्पादक शेतकरी आहेत. पंढरपुरातच खवा तयार होत असल्याने पंढरपूरच्या पेढ्याला स्वतःची 'पंढरपुरी' म्हणून एक वेगळी चव आहे. काही उत्पादक यंत्राद्वारे तर काहीजण जुन्या पद्धतीने चुलीवर दूध आटवतात. खव्यापासूनचा साधा पेढा, मलईयुक्त, कमी साखर व केशर यांचे मिश्रण असलेला केशरी तर खवा जास्त भाजल्यानंतर भुरकट दिसणारा कंदी पेढा असे प्रकार येथे पाहण्यास मिळतो.

खवा बाजारात होते मोठी उलाढाल

पंढरपूर परिसरातील कोर्टी, पेहे, रोपळे या गावातील सुमारे १०० हून अधिक शेतकरी खवा व्यवसायात आहेत. ते स्वतः पेढा उत्पादक-विक्रेत्यांना खव्याचा पुरवठा करतात. सध्या प्रति किलो २७० रुपर्यापर्यंत खव्याचा दर आहे. मंगळवारी आणि शनिवारी खव्याच्या खरेदी-विक्रीसाठी -खास बाजारही भरतो. त्यात छोटे-मोठे विक्रेते, मिठाई व्यावसायिक तसेच घरगुती ग्राहकही खव्याची खरेदी करतात. त्यामुळे खवा बाजारात लाखोंची उलाढाल होते.

पेढ्यांसोबत बर्फीलाही मागणी

गेल्या काही वर्षांपासून आषाढी कार्तिकी यात्रेमध्ये पेढ्यांसोबत बर्फीलाही मोठी मागणी वाढली आहे. यामध्ये प्रामुख्याने मलाई बर्फी, मँगो बर्फी, गुलकंद बफीं, अंजीर बर्फी आधी बींचे प्रकार विक्रीस ठेवले जातात. बर्फीची किंमत ५६० रुपये प्रती किलो आहे. आषाढी यात्रा कालावधीत पाच दिवसांमध्ये २५०-३०० किलो बर्फी विकली जाते.

प्रत्येक वारकरी प्रासादिक साहित्यासोबत पेढा हा प्रसाद म्हणून घेतोच. गेल्या १०० वर्षांपासून आम्ही पेढा व्यवसायात आहोत. आम्ही स्वतःच पेढे तयार करतो. वारीच्या दोन दिवस आधी पेढ्याची तयारी करतो. त्यामुळे तो पुढील चार-पाच दिवस टिकतो. आमच्याकडे पेढा बनवण्याच्या कारखान्यात पंधरा कामगार काम करतात.
कपिल देशपांडे, पेढा उत्पादक, विक्रेते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT