महाराष्ट्र सदन  Pudhari Photo
मुंबई

Pahalgam Terror Attack |पहलगाम दहशतवादी हल्ला: राज्य प्रशासनाशी महाराष्ट्र सदन सतत संपर्कात

Jammu Kashmir violence | आतापर्यंत ३०८ पर्यटकांशी संपर्क

पुढारी वृत्तसेवा

Pahalgam Terror Attack

नवी दिल्ली : जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या सहा महाराष्ट्रीयन पर्यटकांच्या पार्थिवांची सुखरूप व्यवस्था आणि जखमींच्या मदतीसाठी, महाराष्ट्र सदन सक्रियपणे कार्यरत आहे.

जम्मू-कश्मीर प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृतांपैकी चार पार्थिव मुंबईला, तर दोन पार्थिव पुण्याला दिल्लीमार्गे पाठवण्यात येणार आहेत. पार्थिवांबरोबर असलेल्या नातेवाईकांशी महाराष्ट्र सदन येथील राजशिष्टाचार विभागातील अधिकारी सतत संपर्कात आहेत.

या हल्ल्यात जखमी झालेले चार पर्यटक सुखरूप असून, त्यांच्याशी संपर्क साधण्यात आलेला आहे. तसेच, जम्मू-कश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या इतर पर्यटकांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत 308 पर्यटकांशी संपर्क साधला गेला आहे. स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून या पर्यटकांच्या निवास आणि पुढील प्रवासाची व्यवस्था करण्यात येत आहे.

महाराष्ट्र सदनातील निवासी आयुक्त कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली असून, सर्वोतोपरी मदत आणि समन्वयासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT