Mission Admission: 1 लाख 45 हजार विद्यार्थ्यांचे 5 लाखांवर अर्ज Pudhari File Photo
मुंबई

Mission Admission: 1 लाख 45 हजार विद्यार्थ्यांचे 5 लाखांवर अर्ज

मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व नोंदणीस मुदतवाढ; सुधारित वेळापत्रक जाहीर : 26 मे पर्यंत करता येणार ऑनलाईन नावनोंदणी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत महाविद्यालय पदवीच्या 3 आणि 4 वर्षीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीस मुदतवाढ देण्यात आली आहे. सुधारीत वेळापत्रकाप्रमाणे आता विद्यार्थ्यांना 26 मे पर्यंत प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी करता येणार आहे. तर प्रवेशाची पहिली यादी 27 मे रोजी जाहीर होणार आहे. आतापर्यंत 1 लाख 45 हजार 087 एवढ्या विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांसाठी 5 लाख 9 हजार 578 एवढे अर्ज केले आहेत. पदवी अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाकडे प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे.

शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी मुंबई विद्यापीठाने प्रथमवर्षाच्या विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु केली असून आतापर्यंत 2 लाख 25 हजार 556 एवढी नोंदणी झाली असून, 1 लाख 45 हजार 087 एवढ्या विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांसाठी 5,09,578 एवढे अर्ज सादर केले आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार व महाराष्ट्र शासनाच्या 20 एप्रिल 2023 च्या शासन निर्णयानुसार 3 वर्षीय पदवी अभ्यासक्रम, 4 वर्षीय ऑनर्स/ ऑनर्स विथ रिसर्च, 5 वर्षीय इंटिग्रेटेड प्रोग्राम्स विथ मल्टीपल एन्ट्री अँड मल्टीपल एक्जिट या अनुषंगाने ही प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. https://mu.ac.in/admission या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

पदवीच्या प्रथम वर्षासाठी होणारे सर्व प्रवेश आणि त्यांचे शैक्षणिक उपक्रम हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठ आणि विद्यापीठ अनुदान आयोग यांनी वेळोवेळी घालून दिलेल्या तरतूदी आणि मार्गदर्शक तत्वानुसार होतील. मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये आणि स्वायत्त महाविद्यालयांनी निर्गमित केलेल्या या वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया राबवावी. तसेच महाविद्यालयांकडे असलेल्या प्रवेश क्षमतेनुसार, आरक्षणाचे नियम व तरतूद आणि अभ्यासक्रमांच्या पात्रतेनुसार प्रवेश प्रक्रिया राबवावी असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले.

अर्ज प्रक्रिया या अभ्यासक्रमांची..

बी.ए, बी.एस्सी, बी.कॉम, बीए.एमएमसी, बी.एसडब्ल्यू, बीए (फिल्म टेलेव्हिजन अँड न्यू मीडिया प्रोडक्शन), बीए (फ्रेंच स्टडीज), बीए (जर्मन स्टडी), बॅचलर ऑफ कलिनरी आर्ट, बीए-एमए ( इंटिग्रेटेड कोर्स इन जर्मन स्टडीज), बीए-एमए ( इंटिग्रेटेड कोर्स इन पाली) बीएमएस-एमबीए (पाच वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम), बीकॉम (फायनान्शिअल मार्केट), बीकॉम ( अकॉउन्टींग अँड फायनान्स), बीकॉम ( बँकिंग अँड इन्शुअरन्स), बीकॉम ( फायनान्शिअल मॅनेजमेंट), बीकॉम ( इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट), बीकॉम ( ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट), बीकॉम ( मॅनेजमेंट स्टडीज), बीएस्सी ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी), बीएस्सी (कम्प्युटर सायन्स), बीएस्सी (हॉस्पिटॅलिटी स्टडी), बीएस्सी (मायक्रोबायोलॉजी), बीएस्सी ( बायो-केमेस्ट्री), बीएस्सी (बायो-टेक्नॉलॉजी), बीएस्सी (मेरिटाईम), बीएस्सी (नॉटिकल सायन्स), बीएस्सी (फॉरेन्सिक सायन्स), बीएस्सी (होम सायन्स), बीएस्सी ( एरोनॉटिक्स), बीएस्सी ( डेटा सायन्स), बीएस्सी (एव्हीएशन), बीएस्सी (ह्युमन सायन्स), बी.व्होक (टी अँड एचएम, आरएम, एफएम अँड एस, आरईएम, एमपी, एमएलटी, ग्रीन हाऊस मॅनेजमेंट, फार्मा एनेलिटिकल सायन्स, टूरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, एफ. वाय. बी व्हॉक (सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट), एफवाय बी. लायब्ररी सायन्स, बी. म्युझिक, बीपीए (म्युझिक), बीपीए (डान्स) एफवाय.बीएस्सी ( बायोएनॅलिटिकल सायन्स- पाच वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम) यासह अशा अनुदानित आणि विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT