नितेश राणे यांनी अवघ्या चार ओळींची सूचक पोस्ट केली शेअर
कणकवलीमधील नगरपालिका निवडणुकीत होते भाजप विरुद्ध सर्वपक्षीय असं चित्र
नगरपालिका निकालानंतरच्या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Nitesh Rane on Nagar Panchayat 2025
मुंबई: नगरपालिका निकाल लागून २४ तास होण्यापूर्वीच मंत्री नितेश राणे यांनी सोशल मीडियावर केलेल्या सूचक पोस्टने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. "आता ती वेळ आली आहे," असे म्हणत राणे यांनी गौप्यस्फोटाचे संकेत दिले आहेत.
नितेश राणे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, गप्प होतो.. पक्षाच्या, माझ्या नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी..पण काही गोष्टी बोलल्या नाहीत तर खऱ्या वाटायला लागतात.. पण आता ती वेळ आली आहे!. नितेश राणे यांनी अवघ्या चार ओळींची पोस्ट शेअर केल्यानंतर राजकीय वर्तुळात याची चर्चा सुरू झाली आहे.
नगरपालिका निकाल लागायला २४ तास होण्यापूर्वीच नितेश राणे यांनी सूचक पोस्ट केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेची ठरली आहे. कणकवलीमधील नगरपालिका निकाल हा सिंधुदुर्गचे पालकमंत्री असणाऱ्या नितेश राणे यांच्यासाठी धक्कादायक ठरला. येथे शहर विकास आघाडीचे संदेश पारकर यांनी १४५ मतांनी विजय मिळवला. कणकवलीत भाजप विरुद्ध सर्वपक्षीय असं चित्र होतं.
निवडणुकीपूर्वी नितेश राणे यांनी संदेश पारकर यांच्यावर मोठा आरोप केला होता. यानंतर निलेश राणे यांनी निवडणुकीपूर्वी एक स्टिंग ऑपरेशन करत बेहिशोबी पैसे पकडून दिले होते. यानंतर निवडणूक निकालानंतर नितेश राणे यांची सोशल मीडियावर केलेली सूचक पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. नितेश राणे यांनी दिलेला सूचक इशारा नेमका कोणाला आहे याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शिवसेनेला कोकणातील नगरपालिका आणि नगर परिषदांमध्ये यश मिळवलेले आहे. त्यामुळे आता नितेश राणे यांनी नेमका कोणाला अप्रत्यक्ष इशारा दिला याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. तसेच सूचक पोस्ट केल्यानंतर आता याबाबत नितेश राणे केव्हा आपले मत मांडणार याची उत्सुकताही राजकीय वर्तुळात लागून राहिली आहे.