Bombay High Court
स्पर्म किंवा एग डोनरचा मुलांवर कायदेशीर अधिकार नाही file photo
मुंबई

Bombay High Court | स्पर्म किंवा एग डोनरचा मुलांवर कायदेशीर अधिकार नाही

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मेहुणीने एग डोनेट केल्यामुळे आपल्याला जुळ्या मुली झाल्याने त्या मुलींवर मेहुणीचा बायोलॉजिकल पालक म्हणून अधिकार असल्याचा दावा करणार्‍या पतीला उच्च न्यायालयाने (Bombay High Court) झटका दिला. न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या न्यायालयाने एखाद्याने स्पर्म किंवा एग डोनेट (Sperm and Egg donor) केले असले तरी तो त्या मुलांवर कोणताही कायदेशीर हक्क गाजवू शकत नाही, असे स्पष्ट करत पतीचा दावा फेटाळून लावला. मात्र त्याच्या पत्नीला तिच्या जुळ्या मुलांना भेटण्याची परवानगी न्यायालयाने दिली.

पत्नीला मूल होत नसल्याने मेहुणीने तिचे एग डोनेट (Egg donor) करण्यास स्वेच्छेने परवानगी दिली. त्यानुसार डिसेंबर 2018 मध्ये सरोगेट महिलेने (Surrogate women) या मुलांची गर्भधारणा केली आणि ऑगस्ट 2019 मध्ये जुळ्या मुलींचा जन्म झाला. त्यानंतर मार्च 2021 मध्ये वैवाहिक कलहानंतर, पती तिला न सांगता मुलांसह दुसर्‍या फ्लॅटमध्ये राहायला गेला. मुलींना भेटण्याची परवानगी मिळावी यासाठी 42 वर्षीय महिलेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर न्यायमूर्ती मिलींद जाधव यांच्या समोर सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्तीच्या पतीने याला विरोध केला. बहिणीच्या अपघातानंतर पत्नी निराश झाली होती. जुळ्या मुलींचे संगोपन आपण केले. केवळ मेहुणीने एग डोनेट केल्यामुळेच जुळ्या मुलींचा जन्म झाला. तिचा या मुलांवर बॉयोलॉजिकल पालक म्हणून हक्क आहे. तसेच पत्नीचा या मुलांवर अधिकार नाही, असा दावा केला.

SCROLL FOR NEXT