CNG Buses Pudhari
मुंबई

CNG Buses: नवी मुंबईकरांच्या सेवेत एनएमएमटीच्या ५१ नवीन सीएनजी बस

वाढत्या लोकसंख्येनुसार एनएमएमटीची क्षमता वाढविणे काळाची गरज आहे.

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई: वर्षभरात दीडशे नवीन सीएनजी बस नवी मुंबईकरांच्‍या सेवेत देण्‍याचे नियोजन नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाने (एनएमएमटी) केले असून यातील ५१ बसगाड्यांचे शनिवारी वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते लोकार्पण झाले.

कार्यक्रमाला महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत, स्थायी समिती सभापती अशोक पाटील, परिवहन समिती सभापती विकास झंझाड यांच्यासह लोकप्रतिनिधी, महापालिकेचे अधिकारी आणि एनएमएमटीचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना वनमंत्री गणेश नाईक म्हणाले की, नवी मुंबईतील नागरिकांना दर्जेदार आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देणे हे महापालिकेचे प्राधान्य आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार एनएमएमटीची क्षमता वाढविणे काळाची गरज आहे.

म्हणूनच वर्षभरात १५० नव्या सीएनजी बसेस ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन देतानाच प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि वेळेवर होईल, यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्नशील राहील.

नवीन बसेसच्या समावेशामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक होणार आहे. प्रमुख मार्गांवरील बसफेऱ्यांची वारंवारता वाढणार असून, प्रवाशांना बससाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागणार नाही.

त्यामुळे वेळेची बचत होण्याबरोबरच दैनंदिन प्रवास अधिक सुलभ आणि आरामदायी होईल. आधुनिक सीएनजी बसेसमुळे हवेचे तसेच ध्वनी प्रदूषण कमी होण्यास मदत होणार असून, नवी मुंबईला स्वच्छ, सुंदर आणि ग्रीन सिटी बनविण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. असे गणेश नाईक म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT