मुंबई : मंत्री नितेश राणे यांनी धाराशिवमध्ये भाजप कार्यकर्ता मेळाव्यातून शिंदेच्या शिवसेनेला इशारा दिला. 'सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय सगळ्यांनी लक्षात ठेवा,' असं नितेश राणे यांनी म्हटले. यावर त्यांचे बंधू आमदार निलेश राणे यांनी 'नितेशने जपून बोलावे' असा सल्ला दिला आहे. नितेश राणे भाजपमधून आमदार आहेत तर निलेश राणे शिंदेंच्या शिवसेनेतून आमदार आहेत.
"नितेशने जपून बोलावे, मी भेटल्यावर बोलेनच. पण, आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे. सभेत बोलणं सोपं आहे. पण, आपल्या बोलण्यामुळे आपण नेमकं कोणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे. आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही," असा सल्ला निलेश राणे यांनी दिला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारी एक बातमी सध्या जोर पकडत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीसाठी पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी तर थेट गौप्यस्फोट करत, दोन्ही बंधू एकत्र येण्यासाठी 'मातोश्री'वर बैठक पार पडली असून, उद्धव ठाकरे यांनी युतीसाठी सकारात्मकता दर्शवली असल्याचे म्हटले आहे. या खुलाशामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या शक्यतेने नवी समीकरणे जुळण्याची चिन्हे दिसत आहेत.