मूंबई : दहा वर्षापूर्वी घटनेबाबात आता तुम्ही का सोशल मिडीयात पोस्ट करता आहात? हे मला कळत नाही. मी तुमच्याविषयी काही वाईट बोललो का? मी काही वाईट पोस्ट केली का? मी तुमच्या शेजारी राहतो का ? मी तुम्हाला ना त्रास देतो, तरीही दामग दहा वर्षानंतर तुम्ही म्हणता चला हवा येऊ द्याच्या सेटवर माझे पाच ते सहा तास वाया गेले. पण तुम्ही माझ्याविषयी काल पोस्ट केल्यानंतर मला काल दिवसभर शंभर दिडशे फोन आले.अनेकांनी सांगितले जे ज्येष्ठ आहेत ते बोलू शकतात. असे एक ना अनेक फोन. मी माझे मला काम करतो पण तुमच्यामुळे माझेही सहा तास वाचा गेलेत आहेत. अशा शब्दात डॉ. निलेश साबळे यांनी राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी सोशल मिडीयातून केलेल्या टीकेला प्रत्यूत्तर दिले आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की आज सोशल मिडीयावर शरद उपाध्ये यांनी एक पोस्ट केली होती . की चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात निलेश साबळे नसणार आहेत. या बातमीचा आधार घेत उपाध्ये यांनी गर्विष्ठ माणसाचे नेहमीच अधःपतन होते अशा आशयाची पोस्ट करत साबळे यांच्यावर जळजळीत टीका केली. यावर डॉ. निलेश साबळे यांनी आज एक व्हिडीओ पोस्ट करत उपाध्ये यांना उत्तर दिले आहे. यामध्ये ते म्हणातात मी निलेश साबळे मला उपाध्ये सर यांच्याशी थेट संवाद साधता आला असता. पण तुम्ही सोशल मिडीयातून बोलला म्हणून मीही बोलत आहे.
तुम्ही मला झी मराठीने डच्चू दिला, , हकालपट्टी केली असे पोस्टमध्ये म्हणाला. याबाबत तुम्हाला माहिती आहेत का, तुमच्यासारख्या मोठ्या लोकांनी पहिल्यांदा माहिती घ्यायला पाहिजे होती. तुम्हाला गुरु म्हणून अनेक लोक सोशल मिडीयावर फॉलो करतात.मी तुमचा आदर करतो पण तुम्ही फोन करुन झी मराठीत विचारले पाहिजे होते. झी मराठीचे हेड रोहन राणे यांनी मला फोन केला होता. आमची मिटींगही झाली होती. पण मी सध्या पिक्चरच्या कामात व्यस्त आहे. आहे मी स्वतः या कार्यक्रमासाठी नकार दिला होता. तसेच अभिनेते भाऊ कदम ही सुद्धा या पर्वात नसणार आहेत.
तुम्ही म्हणालात माझा अपमान केला २०१४ ते १५ या दरम्यान, हा कार्यक्रम झाला होता. तुम्ही म्हणाला तुम्हाला पाणीही दिले नाही असा आरोप केलात. तर हा कार्यक्रमाची जबाबदारी असलेली एस्सेल वर्ड ही कंपनी प्रत्येक पाहूण्यांची चांगल्याप्रकारे बडदास्त ठेवते ज्या क्लासिक स्टुडीओ मध्ये हे शूट झाले त्यातील सर्वात मोठी एसी रुम दिली होती, तसेच प्रत्येक रुममध्ये पाण्याच्या बाटल्या ठेवल्या होत्या. त्यामुळे पाणी मिळाले नाही याला मी जबाबदार आहे का? असा प्रश्न साबळे यांनी उपस्थित केला.
साबळे सर्व कलाकारांच्या गप्पा मारत होते व शेवटी माझ्या रुममध्ये आला असा आरोप उपाध्ये यांनी केला होता. पण तुम्हाला आठवते का पहा पण मी तुमच्या पाया पडलो, आपला संवाद झाला होता. तसेच कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी आपला कॉल झाला यातही आपला हसतखेळत संवाद झाला. तसेच यावेळी अशोक हांडे, रामदास पाध्ये सर हे दोन इतर पाहूणे होते.
त्यांच्याशी माझा अगोदर संवाद झाला नव्हता त्यामुळे कार्यक्रमासाठी काय करायचे याची चर्चा केली. त्यामुळे स्माईल दिली नाही व फक्त डोकावून गेला हा आरोप चुकीचा आहे. असे साबळे म्हटले आहेत.
२०२५ मध्ये दहा वर्षांनी तुम्ही आता हा मुद्या मांडला पण २०१७ मध्ये निर्मिती सावंत यांच्या मुलाच्या लग्नात आपण भेटलो तेही एकाच टेबल वर बसून गप्पा मारल्या दोन ते अडीच तास गप्पा मारल्या, कौतुक करत होता, चला हवा येऊ द्या बद्दल बोलला होता. यावेळी तुम्ही हा मुद्या का मांडला नाही. असा सवाल साबळे यांनी केला आहे.
पुढे ते म्हणता की सोशल मिडीया वापरतो त्याला वेगळा वास येतो, कॉलेजला असल्यापासून मी तुमचा आदर आहे. मी सीडीही पाहतो. पुढेही तुमचा आदर करणार पण ६ वर्षापूर्वी तुम्ही एक पोस्ट केली होती तेव्हाही मी दुर्लक्ष केली होती. यामध्ये अपमान नाही, यापर्वी एका मोठया वर्तमानपत्रात असेच काही म्हटला होता. पण आता मला उत्तर द्यावेच लागले.
अभिजित खांडकेकर माझा चांगला मित्र, हा चांगला, तो चांगला हे वातावरण आम्हाला करायचे नाही, किंवा कोणाच्या सल्ल्याची गरज अभिजितला नाही, तो उत्तम अँकरीग करतो. त्याची नी माझी मैत्री कायम आहे आणि पुढेही राहील. मी अभिजित खांडकेकर, चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो.
आदरणीय नीलेशजी साबळे,
आपल्याला *हवा येऊ द्या* च्या दुस-या पर्वातून डच्चू देऊन त्या जागी अभिजीत खांडकेकरना आणल्याची बातमी आज पेपरमध्ये वाचली.वाईट वाटले पण आश्चर्य नाही मला तुम्ही एकदा बोलवले होते.त्याप्रमाणे मी ११ वा.पोहोचलो.पण ३ वाजेपर्यंत त्या रुममध्ये कोणीच फिरकले नाही. मला पाणी हवे होते पण एका-दोघांना सांगूनही ते आणतो म्हणून गेले ते आलेच नाहीत.मला रुम सोडू नका असे सांगितले होते.नीलेश तुम्ही इतर कलावंतांच्या रुम मध्ये जाऊन गप्पा मारीत होतात पण माझ्या रुममध्ये डोकावलात ते थेट ४ वा.स्माईलही न देता स्टेजवर गेलात. इतरांचे शूटिंग खूप वेळ केलेत पण मला ६ वा. बोलावून घाईघाईत १५ मिनिटात सारे आटोपले. त्यावेळीही इतर कलावंत मधेमधे बोलत होते.माझा सारा दिवस फुकट गेला.एडिटींग मध्येही माझी उत्तरे गाळलीत. बाहेर आपली भेट झाली तेंव्हा वडीलांच्या नात्याने काही सल्ले दिले. पण कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून आपल्या डोक्यात हवा गेली होती. दुस-याच्या विषयाबद्दल आदर ठेवायचा असतो पण तुम्ही बेपर्वा होतात.त्याच वेळी मला वाटले की अहंकार अति वाईट.गर्विष्ट माणसाचे अध:पतन होते.एखादी पोस्ट मिळाली की ताठा येतो आणि सर्वनाश होतो. स्टेजवर तुम्ही सा-यांना आपलेसे केले नाही. आपले सादरीकरणही आकर्षक होत नव्हते. या सा-याचा परिणाम म्हणजे तुम्हाला चॅनेलने बाहेर काढले. नीलेशजी स्वभाव मनमिळाऊ असावा सा-यांना सांभाळून घ्यावे मग सारे एकजुटीने काम करून कार्यक्रमाची चर्चा होईल. अभिजीत खांडकेकर ही धुरा चांगली सांभाळतील. मला त्यांचा सहवास मिळाला आहे. आपण अनुभवी आहात. त्यांना मार्गदर्शन करा. इंडस्ट्रीत आपल्याविषयी असलेले गैरसमज आपल्या चांगल्या कामाने दूर करा. आपल्याला ईश्वराची साथ लाभो ही विनंती