मुंबई

दारू पीत रात्रभर केले खासदाराच्या शरीराचे तुकडे, मुंबईतून आलेल्‍या कसाई जिहादकडून कबुली

Arun Patil

मुंबई, पुढारी डेस्क : बांगला देशी खासदार अन्वारुल अझीम अनार यांच्या हत्येच्या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. अन्वारुल यांच्या हत्येसाठी खास मुंबईतून बोलावलेला बांगला देशी कसाई जिहाद होलादार याने हत्येची कबुली देतानाच अन्वारुल यांच्या शरीराचे तुकडे करण्यासाठी अवघी रात्र लागल्याचे म्हटले आहे. हे कृत्य करताना आपण अन्य सहकार्‍यांसमवेत दारूही पीत होतो, असेही त्याने सांगितले.

खा. अन्वारुल यांची कोलकात्यातील राजारहाट येथील त्यांच्याच फ्लॅटमध्ये हत्या केली गेली. याप्रकरणी अटक झाल्यावर जिहादने चौकशीत खा. अन्वारुल यांच्या हत्येची कबुली देतानाच मृतदेहाची विल्हेवाट लावण्यापूर्वी केलेल्या भयंकर कृत्याची माहिती दिली.
खा. अन्वारुल यांचा मित्र अख्तरुझमान शाहिन हा या प्रकरणाचा मुख्य आरोपी आहे. तो अमेरिकेत पळून गेल्याचे समजते.

मुंबईत राहणार्‍या जिहादला अख्तरुझमानने अन्वारुल यांच्या हत्येसाठी दोन महिने आधीच कोलकात्यात आणून ठेवले होते. जिहादने पोलिसांना सांगितले की, खा. अन्वारुल यांच्या शरीरारचे तुकडे करताना त्याचे कपडे रक्ताने माखले होते. यामुळे तो दुसर्‍या दिवशी सकाळी अन्वारुल यांचे कपडे घालून इमारतीबाहेर पडला.

पश्चिम बंगाल सीआयडी आणि ढाका मेट्रोपॉलिटन पोलिसांच्या संयुक्त पथकाने दिलेल्या माहितीनुसार, मारेकर्‍यांनी फ्लॅटमधून बाहेर पडताना खा. अन्वारुल यांचे 4.3 लाख रुपयेही लांबवले. नेपाळमध्ये लपून बसल्याचा संशय असलेला आरोपी मोहम्मद सियाम ऊर्फ भोला याने हे पैसे घेतले होते. त्याला पकडण्यासाठी इंटरपोलमार्फत प्रयत्न सुरू आहेत.

अशी झाली हत्या…

पोलिसांनी सांगितले की, हत्येच्या दिवशी दुपारी 3 वाजता खा. अन्वारुल अझीम यांनी फैसल व शिमुल भुनियानसह फ्लॅटमध्ये प्रवेश केला, तर सेलेस्टी रहमान वरच्या खोलीत होता. तिघेही शूज बाहेर काढून फ्लॅटमध्ये गेले. तेथे जिहाद व सयाम आधीच उपस्थित होते. जिहादने दिलेल्या माहितीनुसार, खोलीत प्रवेश केल्यावर खा. अन्वारुल यांना क्लोरोफॉर्मने बेशुद्ध केले गेले. नंतर त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. सेलेस्टीने सीसीटीव्ही कॅमेरा कापड आणि चिकट टेपने आधीच झाकून ठेवला होता. यानंतर मृतदेह स्वयंपाकघर किंवा बाथरूममध्ये नेण्यात आला. तेथे त्याचे तुकडे केले गेले. हाडे व मांस वेगळे करून वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये पॅक केले गेले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT