विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे.  Pudhari News Network
मुंबई

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा

अविनाश सुतार

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम दिवाकर गोऱ्हे यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. याबाबतचे पत्र मुख्यमंत्री सचिवालयाकडून देण्यात आले आहे. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातर्फे पत्रकातून माहिती दिली आहे. डॉ. गोऱ्हे २००२ पासून विधान परिषदेच्या सदस्या आहेत. सध्या त्यांची सदस्यत्वाची ४ थी टर्म सुरू आहे. (Neelam Gorhe)

1987 मध्ये सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीला सुरुवात

नीलम गोऱ्हे सध्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून कार्यरत आहेत. 2002 पासून सलग चार वेळा परिषदेवर त्या निवडून आल्या आहेत. 1954 मध्ये जन्मलेल्या नीलम गोऱ्हे यांनी मुंबई विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी आयुर्वेदिक औषधात व्यावसायिक पदवी घेतली आहे. 10 वर्षे व्यवसाय केल्यानंतर त्यांनी 1987 मध्ये सामाजिक आणि राजकीय कार्याला सुरुवात केली.

1984 मध्ये स्त्री आधार केंद्राची स्थापना

स्त्रियांना समान अधिकार मिळण्यासाठी त्यांनी 1984 मध्ये स्त्री आधार केंद्राची स्थापना केली. मनीषा कायंदे आणि विप्लव बजारिया यांच्यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत सामील झालेल्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटातील नीलम गोऱ्हे या तिसऱ्या आमदार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT