नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुनावणी आज (मंगळवारी) होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वेळापत्रकात ही तारीख नमूद करण्यात आली आहे. राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत असताना दिर्घ कालावधीनंतर ही सुनावणी होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर निवडणूक आयोगाच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि घड्याळ हे पक्षाचे चिन्ह अजित पवार यांना देण्यात आले होते. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरुद्ध शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह प्रकरण २५ मार्चच्या यादीत दाखवले आहे मात्र सदर प्रकरण त्या दिवसाच्या मुख्य यादीत नाही. सप्टेंबर २०२३ पासून हा विषय पटलावर आलेला नाही. नेहमीच तारीख दिली जाते मात्र ती कोणत्या ना कोणत्या कारणाने पुढे जाते.