मुंबई, पुढारी वृत्तसेवा : महायुती सरकारमधील मंत्री आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नेते छगन भुजबळ यांची अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भुजबळ आज (दि.26) पुण्यात होते. त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना विशेष विमानाने पुण्यातून मुंबईत आणण्यात आले.