मुंबई : अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या (एनसीबी) मुंबई विभागाने आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश करत सुमारे ११ किलो इफेड्रिन जप्त केले. त्याची किंमत सुमारे ५ कोटी रुपये आहे. या प्रकरणी चेन्नईतून एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.
एनसीबीला मिळालेल्या माहितीनुसार, २१ जुलै आणि २५ जुलै रोजी न्यूझीलंडला पाठविण्यात येणारी तीन आंतरराष्ट्रीय कुरिअर पार्सल अडविण्यात आली. यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आला होता. तपासादरम्यान फ्लोअर मॅट, बेडशीट आणि फोटो फ्रेममध्ये अत्यंत कौशल्याने लपवून ठेवलेले १० हजार ९९० किलो इफेड्रिन जप्त केले. तपासाचा धागा पकडत एनसीबीच्या पथकाने चेन्नईतील त्रिप्लिकेन परिसरात छापा टाकून एस. हमीद या संशयिताला अटक केली.