Ganesh Naik Navi Mumbai  Pudhari
मुंबई

Ganesh Naik: नवी मुंबईतील पाणीकपातीस मंत्री गणेश नाईकांचा विरोध

मोरबे धरणातील पाणीसाठा घटल्याच्या चर्चेदरम्यान वनमंत्री गणेश नाईक यांचे वक्तव्य; पालिका प्रशासनाला ठोस भूमिका घेण्याचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई: मोरबे धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने नवी मुंबईत १० टक्के पाणी कपात लागू होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच, वनमंत्री गणेश नाईक यांनी तशी शक्यता फेटाळून लावली.

गुरुवारी आयोजित जनता दरबारात त्यांनी ही ग्वाही देत महापालिका प्रशासनाला पाणीपुरवठ्याबाबत ठोस भूमिका घेण्याचे निर्देश दिले. त्यामुळे पाणी कपातीच्या चिंतेत असलेल्या नवी मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

मोरबे धरण नवी मुंबई महापालिकेच्या मालकीचे असतानाही पूर्वीच्या प्रशासनाने लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना विश्वासात न घेता अन्य शहरांना पाणीपुरवठा केल्याचा मुद्दा गणेश नाईक यांनी उपस्थित केला.

नवी मुंबईकरांवर पाणी कपातीची वेळ आणू नये, असे स्पष्ट करत त्यांनी महापालिका आयुक्त आणि शहर अभियंत्यांशी चर्चा केली. शहरात पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतल्यास नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण होईल, असा इशाराही त्यांनी दिला.

महापालिका आयुक्त आणि तांत्रिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारवी धरणासह अन्य तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर येत्या दोन ते तीन महिन्यांत नवी मुंबईला ५० दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) अतिरिक्त पाणी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. भविष्यात अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार असल्याने सध्या पाणी कपात करण्याची गरज नसल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT