नवी मुंबई महानगरपालिका pudhari photo
मुंबई

Vashi Hospital Patient Death : नवी मुंबई पालिकेच्या वाशी रुग्णालयात मुदत संपलेले सलाईन लावल्याने रुग्णाचा मृत्यू

महापालिकेच्या आरोग्य विभागातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई : महापालिकेच्या वाशी रुग्णालयात मुदत संपलेले सलाईन लावल्याने गोटीराम खडसे नामक रुग्णाचा अखेर मृत्यू झाला. दोन दिवस त्याची प्रकृती बिघडत गेली आणि फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू असतानाच बुधवारी रात्री त्याची प्राणज्योत मालवली.

या मृत्यूमुळे महापालिकेच्या आरोग्य विभागातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून, गोटीराम यांच्या मुलासह बजरंग दल कार्यकर्त्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रवींद्र म्हात्रे यांच्या केबिनमध्ये गुरुवारी ठिय्या आंदोलन केले. गोटीराम यांच्या मृत्यूला जबाबदार कोण असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला व या प्रकाराची जबाबदारी निश्चित करून गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

३१ ऑगस्ट रोजी गोटीराम खडसे यांना ताप आल्याने वाशी महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान मुदत संपलेले सलाईन लावल्याचे त्यांच्या मुलाच्याच लक्षात आले. त्याने ते डॉक्टरांच्या निदर्शनास आणून दिले. तोपर्यंत गोटीराम यांच्या अंगाला खाज सुरू झाली. खोकलाही वाढला. जुन्या सलाईनची ही रिॲक्शन होती. ती इतकी गंभीर झाली की, गोटीराम यांना फोर्टिस रुग्णालयात हलवावे लागले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT