नवी मुंबई : रक्षांबधनच्या पुर्वसंध्येला पोस्टाच्या संकेतस्थळात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे राख्या पोहोचवण्यात येणार्या अडचणींवर मात करून पोस्टाच्या कर्मचार्यांनी रक्षांबधनच्या दिवशीदेखील राखी पोहचवण्याचे काम केले.
रक्षाबंधनानिमित्त राज्यातून आणि परराज्यातून आलेल्या राख्या योग्य पत्त्यावर पोहोचतील याची दक्षता पोस्टाच्या कर्मचांर्याकडून घेण्यात आली. स्पीड पोस्ट, रजिस्टरने आलेल्या राख्या रक्षाबंधनाच्या दिवशी पोहचवण्यासाठी पोस्टमनने अपुर्ण पत्ता, पिन कोड चुकीचा असताना देखील राख्या पोहचवल्या. स्पीड पोस्ट तसेच रजिस्टरने आलेल्या राख्यावरील चुकीचा पत्ता असतानासुध्दा राख्या योग्य पत्त्यावर पोहचवणे ही पोस्टमनसाठी तारेवरची कसरत होती.
त्यामुळे पोस्टामधील लिफाफ्यावरील फोन नंबरवरुन पोस्टामध्ये येऊन राख्या घेऊन जाण्याच्या सूचना भावांना केल्या. विशेष म्हणजे पोस्टातील कर्मचार्यांनी स्वखर्चाने फोन करुन भावांना सांगितले. रक्षांबधन हा भावा बहीणीच्या जिव्हाळाचा सण असल्यामुळे पोस्टातील कर्मचार्यांनी माणसुकी दाखवत अनेकांना फोन करून पाठवलेल्या राख्या घेऊन जाण्याचे आवाहन केले. यावेळी पोस्टामध्ये येणार्या राख्या या दुसर्या भाषेत लिहलेल्या देखील होत्या. मात्र अन्य भाषेत लिहण्यात आलेला पत्ता पोस्टातील कर्मचार्यांना वाचता न आल्यामुळे पोस्टाच्यावर लिहण्यात आलेल्या नंबरवर फोन करुन कळवण्यात येऊन त्या घेऊन जाण्याच्या सुचना केल्या होत्या, असेही पोस्टातील कर्मचार्यांनी सांगितले.