Parsik Hill Railway Accident Pudhari
मुंबई

Navi Mumbai Accident: पारसिक हिलवरून चारचाकी थेट रेल्वे रुळावर; नवी मुंबईत विचित्र अपघात

Navi Mumbai Accident: पघातानंतर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून एक लोकल ट्रेन थांबवावी लागली.

पुढारी डिजिटल टीम

Panvel Uran Railway Parsik Hill Accident

नवी मुंबई : नवी मुंबईत पारसिक हिलवरून एक चारचाकी वाहन थेट रेल्वे रुळावर कोसळल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी घडली. या अपघातामुळे बेलापूर–उरण मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. अपघातानंतर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून एक लोकल ट्रेन थांबवावी लागली.

पनवेल–उरण रेल्वे मार्गावर पारसिक डोंगरावरुन चार चाकी गाडी थेट रेल्वे रुळावर कोसळली. गुरुवारी दुपारी 3.15 ते 3.30 च्या सुमारास ही घटना घडली. अपघाताचे वृत्त समजताच पोलीस आणि रेल्वे प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले. गाडी हटवण्याचे काम सुरू असून या अपघातामुळे पनवेल- उरण अप आणि डाऊन लाइनवर परिणाम झाला.

दरम्यान, या विचित्र अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. तरुणाचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. अपघात कसा घडला, नेमकी चूक कोणाची हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT