नवी मुंबई: नवी मुंबईत भाजपचे मंत्री गणेश नाईक यांनी निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत 77 जागांवर विजयी मिळवला आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 31 जागांवर समाधान मानावे लागले. यामुळे नाईकांनी शिंदेंचा टांगा पलटी घोडे फरार केल्याची चर्चा आता शहरात सुरु झाली आहे.
भाजप आणि शिवसेनेची युती नको असा आग्रह खुद्द मंत्री गणेश नाईक यांनी भाजप पक्षश्रेष्ठींकडे केला होता. त्यानुसार केवळ निमित्त म्हणून शिवसेना आणि भाजपची बैठक होऊन युती जागावाटपावरून तोडण्यात आली होती. दोन्ही पक्षांकडून स्वबळावर निवडणूक लढू असे जाहीर करण्यात आले होते. त्यात भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी 13 जागा गणेश नाईक यांच्याकडे मागितल्यानंतर त्यांना केवळ चार जागा देण्यात आल्या होत्या. त्यानंतर गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांच्यात वाद झाला आणि 111 जागा जिंकून दाखवल्यास मी राजकारण सोडने असे आवाहन केले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत मंदा म्हात्रे यांचा हात धरून समेट घडवून आणला. त्यानंतर मंदा म्हात्रे यांनी बेलापूर मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली. तर शिवसेनेचे एकनाथ शिँदे यांनी रोड शो, जाहीर सभा घेतल्या. उमेदवारांच्या मागे ठामपणे उभे राहीले. नवी मुंबईतील ही निवडणूक खऱ्या अर्थान गणेश नाईक विरोधात एकनाथ शिंदे अशी होती.
आरोप प्रत्यारोप करण्यात आले. वरिष्ठांनी परवानगी दिली तर शिंदेचे टांगासह घोडे ही बेपत्ता करेन.मला ही हलक्यात घेऊ नये असा इशाराच नाईक यांनी खुलेआम एकनाथ शिंदेंना दिली. नवी मुंबईतील निवडणूक प्रमुख म्हणून संजीव नाईक तर पक्षप्रवेश करत माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, पुतण्या वैभव नाईक, याशिवाय नाईकांच्या सुना ही प्रचारासाठी पहिल्यांदाच घराबाहेर पडल्या होत्या. यावेळी निवडणूक प्रमुख माजी खासदार संजीव नाईक यांनी विरोधकांवर खोचक टिका केली. यांनी कुणाकडून पैसे आणले. याची सर्व माहिती आहे आमच्याकडे. 82 वेळा गणेश नाईक महापालिकेत गेले.
नवी मुंबईकरांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत मी गणेश नाईक यांच्या पाठीशी उभा आहे. काळजी करु नका. असे पाठबळ दिले. यामुळेच नवी मुंबईत भाजपची सत्ता आली आहे. कुणा टांगा आणि घोडे फरार झाले हे निकालानंतर स्पष्ट झाल्याचे संजीव नाईक यांनी सांगितले.