नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षणमध्ये लावण्यात आलेल्या लिटल बिन्स काही ठिकाणी कचराकुंड्या बनल्या आहे. तर काही ठिकाणी लिटल बिन्स चोरील्या जाण्याचे प्रकार निदर्शनास आले आहे. महापालिका क्षेत्रात जवळपास ५०० पेक्षा अधिक लिटल बिन्स रस्त्याच्या बाजुला बसवण्यात आल्या आहेत. मात्र या लिटल बिन्सकडे नागरिकांनी कचरा टाकण्यासाठी पाठ फिरवली आहे. तर काही नागरिकांनी या लिटल बिन्समध्ये घरातील कचरा आणून टाकत त्या फुल करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सुज्ञान नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.
स्वच्छ सर्वेक्षणमध्ये नवी मुंबई शहर स्वच्छ राहवे यासाठी महापालिकेने विविध योजना राबवल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी कचरा टाकून घाण करू नये यासाठी महापालिकेने शहरात सार्वजनिक विविध ठिकाणी ५०० पेक्षा अधिक लिटल बिन्स बसवल्या आहे. महापालिकेने कचराकुंडीमुक्त शहर बनवण्यासाठी कचराकुंड्या हटवल्या आहेत. त्यामुळे रस्त्याने जाता येता किरकोळ बसवलेल्या असताना या लिटल बिन्समध्ये असणारा कचरा टाकण्यासाठी लिटल बिन्स घरातील कचराच आणून टाकला जात असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी लावलेले लिटल बिन्स गर्दुल्ल्यांकडून चोरण्याचे प्रकारही निदर्शनास आले आहेत. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेकडून लाखो रुपये खर्च करून बसवलेले लिटल बिन्स तुटल्यामुळे हा सर्वखर्च वाया गेला आहे.
स्वच्छ सर्वेक्षणमध्ये प्रथम क्रमांक येण्यासाठी प्रयत्न करत आहे. नवी मुंबईकरांनीही याला सहकार्य करणे आवश्यक आहे. घरातील कचरा हा वेळेत येणाऱ्या कचरागाडीत नेऊन टाकावा. तसेच लीटल बीन्समध्ये घरगुती कचरा आणून टाकू नये. लिट्ल बीन्सच्या डब्यांचीही काही समाजकंटक चोरी करत आहेत.डॉ. अजय गडदे, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन
रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांनी रस्त्यात कचरा टाकूनये. तसेच तो कचरा एकाच ठिकाणी रहावा, यासाठी शहरात महापालिकेने लिटल बीन्स बसवल्या आहेत. पण कचराकुंडीमुक्त शहर करत असताना लीटल बीन्स हीच कचराकुंडी समजून त्यामध्ये कचरा आणून टाकला जात आहे.
नवी मुंबई महापालिकेने बसवलेले लिटल बिन्स हे गर्दुल्ल्यांकडून चोरीला जाण्याचे प्रकार घडत आहेत. तर सार्वजनिक ठिकाणी कचरा होऊ नये यासाठी लिटल बिन्स बसवलेले असताना घरांजवळच्या लिटल बिन्समध्ये घरातील कचरा आणून टाकला जात आहे. त्यामुळे लिटल बिन्स तत्काळ भरतात. असे महापालिकेच्या एका स्वच्छता अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.