नरहरी झिरवाळ  (pudhari file photo)
मुंबई

Narhari Zirwal | मंत्री नरहरी झिरवळ यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल

राजकीय वर्तुळात खळबळ : चर्चेला उधाण

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावरील भाष्य आणि मंत्रालयातील लाच प्रकरणामुळे अडचणीत आलेले राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ आता चांगलेच ‘कचाट्यात’ सापडले आहेत. एकीकडे अर्थसंकल्पी अधिवेशनाचे सुप वाजत असताना मंत्री झिरवाळ यांचा कथित व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशाचे बुधवारी सूप वाजले. त्या दिवशी म्हणजे बुधवारी एका कथित अश्लील व्हिडिओमुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. मंत्री नरहरी झिरवळ यांच्या सारख्या दिसणार्‍या व्यक्तीचा एका ट्रान्सजेंडर व्यक्तीसोबतचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओत मंत्री झिरवळ यांच्या सारखी दिसणारी व्यक्ती एका खोलीत बिछान्यावर पडलेली दिसते. त्या व्यक्तीच्या शेजारी एक कर्मचारी वावरत असल्याचे दिसत आहे.

बिछान्यावर पडलेल्या झिरवळ यांच्या शेजारी ट्रान्सजेंडर (ट्रान्सवुमन) व्यक्तीही दिसते. बिछान्याजवळ खाद्य आणि मद्याची बाटलीही दिसत आहे. हा प्रकार शासकीय विश्रामगृहातील असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, हा कथित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली असून चर्चेला उधान आले आहे. दरम्यान, बुधवारी व्हायरल झालेला हा व्हिडीओ सात महिन्यापूर्वीचा असल्याचे बोलले जात आहे. या व्हिडीओच्या सत्यतेबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही. मागील काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री विविध प्रकरणांत अडचणीत येत आहेत. त्यामध्ये झिरवळ हे दोनवेळा अडचणीत आले आहेत.

ट्रान्सवूमनवर मुंबईत खंडणीचे गुन्हे

दरम्यान, मिळालेल्या महितीनुसार या कथित व्हिडीओत मंत्री झिरवळ यांच्या सारख्या दिसणार्‍या व्यक्तीसोबत जी ट्रान्सवूमन आहे, तिचे नाव पवन यादव असल्याचे समजते. धक्कादायक बाब म्हणजे, खुद्द पवन यादवचा भाऊ रवी यादव याने या कथित व्हिडीओच्या माध्यमातून हे संपूर्ण प्रकरण समोर आणल्याचे सांगितले जात आहे. रवी यादवच्या आरोपानुसार, पवन हा ट्रान्सवूमन असून तो खंडणी गोळा करण्याचं काम करतो. दमदाटी आणि खंडणीप्रकरणी पवन यादववर यापूर्वीच मुंबईतील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT