संसार तिघांचा, प्रगतीचा पाळणा मात्र राष्ट्रवादीचा हले; आशिष शेलारांचा मविआवर निशाणा   MVA vs Ashish Shelar
मुंबई

MVA vs Ashish Shelar : संसार तिघांचा, प्रगतीचा पाळणा मात्र राष्ट्रवादीचा हले; आशिष शेलारांचा मविआवर निशाणा  

संसार तिघांचा, प्रगतीचा पाळणा मात्र राष्ट्रवादीचा हले; आशिष शेलारांचा मविआवर निशाणा  

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेसच्या भारत जोडोला पेंग्विन सेनेची साथ दसरा मेळाव्याच्या गर्दीसाठी काँग्रेस देणार हात ! सगळा गोंधळ घालून घड्याळ बघा कसे नामानिराळे संसार तिघांचा, प्रगतीचा पाळणा मात्र राष्ट्रवादीचा हले…असं ट्विट करत भाजप नेते आशिष शेलार यांनी (MVA vs Ashish Shelar) पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

MVA vs Ashish Shelar : सगळं कसं ok मध्ये

भाजपा नेते आशिष शेलार यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्विट करत एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी लिहलं आहे की, "काँग्रेसच्या भारत जोडोला पेंग्विन सेनेची साथ दसरा मेळाव्याच्या गर्दीसाठी काँग्रेस देणार हात ! सगळा गोंधळ घालून घड्याळ बघा कसे नामानिराळे संसार तिघांचा, प्रगतीचा पाळणा मात्र राष्ट्रवादीचा हले. काय तो भारत जोडो….. काय तो पेग्विन सेनेचा दसरा.. शिववड्याच्या चटणीला बिर्याणीचा मसाला हातच्या कंकणाला आरसा कशाला ? सगळं कसं ok मध्ये आहे! अस लिहीतं आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमधून महाविकास आघाडीवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

काही दिवसांपूर्वी आशिष शेलार यांनी ट्विट करत महाविकास आघाडीवर टीका केली होती. "शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर मुंबईत उत्सवाची धूम सुरु आहे. हे पाहून पोटात मळमळ होतेय, मुरड मारतेय म्हणून ते सामनातून जळजळ व्यक्त करत आहेत. ज्यांना मराठी माणसाचे उत्सव आणि आनंद बघून मळमळ, जळजळ होतेय, त्यांना आमचा एकच सल्ला " मग घ्या ना धौती योग!" असा खोचक टोमणा मारला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT