सैफ अली खान याच्यावरील हल्ला प्रकरणातील संशयित आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद. (Image source- X)
मुंबई

Saif Ali Khan stabbing case | आरोपी शरीफुलला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

१६ जानेवारीच्या पहाटे घडली होती हल्ल्याची घटना

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता सैफ अली खान याच्यावरील चाकू हल्ला प्रकरणी (Saif Ali Khan stabbing case) मुंबईतील वांद्रे येथील न्यायालयाने संशयित आरोपी शरीफुल फकीरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. शरीफुल हा बांगला देशी नागरिक आहे. १६ जानेवारीच्या पहाटे हल्लेखोराने सैफच्या घरात घुसून त्याच्या पाठीवर, मानेवर आणि इतर ठिकाणी अनेक वार केले होते.

आरोपी शरीफुल फकीरचीची बाजू मांडणारे वकील संदीप शेरखाने यांनी सांगितले की, "तपासासाठी पोलिस कोठडी देण्याचे कोणतेही कारण नसल्याने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे."

दंडाधिकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले की या प्रकरणी जर नवीन पुरावे मिळाले तर ते नव्या भारतीय न्याय संहिता (BNS) कायद्याअंतर्गत फकीरच्या पोलिस कोठडी वाढवून देण्याची मागणी करू शकतात, जर ती परवानगी असलेल्या १४ दिवसांत येत असेल.

वांद्रे न्यायालयाच्या दंडाधिकाऱ्यांनी सांगितले की, तपास आणि पुरावे गोळा करण्याचे काम जवळजवळ पूर्ण झाल्याने संशयित आरोपीची पोलिस कोठडी वाढवणे अनावश्यक आहे. या प्रकरणी तपास अधिकाऱ्यानी संशयित आरोपीच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्याची विनंती केली होती. या प्रकरणाच्या तपासासाठी आमचे पथक कोलकात्यात असून तेथून अधिक माहितीची वाट पाहत आहोत, असे तपास अधिकाऱ्यांनी म्हटले. पण दंडाधिकाऱ्यांनी त्यांची ही मागणी फेटाळून लावली. पण गरज वाटल्यास निर्धारित कालावधीत त्यांना पुन्हा कोठडीची मागणी करता येईल, असे त्यांनी नमूद केले.

Saif Ali Khan stabbing case | शरीफुल विरुद्ध ठोस पुरावे, पोलिसांचा दावा

''शरीफुल फकीर विरुद्ध ठोस पुरावे आहेत," असे अतिरिक्त पोलिस आयुक्त (पश्चिम) परमजीत सिंह दहिया यांनी मंगळवारी सांगितले होते. सैफ अली खानच्या घरातील बोटांचे ठसे आरोपींच्या बोटांच्या ठशांशी जुळत नसल्याबद्दल प्रश्न उपस्थित झाला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस अधिकाऱ्यांनी शरीफुल विरुद्ध ठोस पुरावे असल्याचे म्हटले आहे.

सैफ अली खान याच्यावर त्याच्या राहत्या घरी हल्ला झाला होता. या हल्ल्यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. ६ दिवसांनी त्याला लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT