प्रणय बोडके याचा अपघातात मृत्यू झाला.  Pudhari Photo
मुंबई

मुंबई: होळीसाठी मित्रासह फुले आणायला गेलेल्या तरुणाचा बसच्या धडकेत मृत्यू,२ जण जखमी

Mumbai Bus Accident | प्रभादेवी येथील एल्फिस्टन ब्रिजवरील घटना

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसच्या धडकेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सोशल मीडिया विभागात काम करणाऱ्या प्रणय बोडके या तरुणाचा मृत्यू झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झाले. ही घटना प्रभादेवी येथील एल्फिस्टन ब्रिजवर बुधवारी मध्यरात्री २.३० वाजता घडली. जखमींवर उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रणय बोडके (वय २९), करण शिंदे (वय २९) आणि दुर्वेश गोरडे हे तिघेजण दुचाकीवरून दादरच्या फुल बाजारात जात होते. होळीच्या पूजेसाठी त्यांना फुले घ्यायची होती. त्याचवेळी प्रभादेवी पुलावर समोरून शिवनेरी बस चुकीच्या दिशेने भरधाव आली. या बसने प्रणयच्या दुचाकीला जोराची धडक दिली. त्यानंतर नागरिकांनी या तिघांना केईएम रुग्णालयात दाखल केले. प्रणयचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, दुर्वेश व करण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

प्रणयच्या मागे पत्नी, आई, वडील व दीड वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. तो काळाचौकी येथील ऐक्यदर्शन सोसायटीत राहत होता. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सोशल मीडिया विभागात तो काम करत होता. त्याच्या अपघाती मृत्यू प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात नोंद झाली असून एसटी चालकविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT