Mumabi News | माझा खांदा राजकारणासाठी वापरु नका!  
मुंबई

Mumabi News | माझा खांदा राजकारणासाठी वापरु नका! वरळीतील भाजपच्या महिला मोर्चातील ‘त्या’ महिलेने व्हीडिओतून केले आवाहन!

महिला विधेयक नामंजुर झाल्याबद्दल वरळीतील मोर्चात गिरीश महाजन यांच्याशी झाला होता महिलेचा वाद

Namdev Gharal

मुंबईः मुंबईतील भाजपच्या महिला आरक्षण दुरूस्ती विधेयकाबाबत काढलेल्या मोर्चावेळी एका महिलेने राग व्यक्त करत त्वरित ट्रॅफिक क्लिअर करण्याची मागणी केली होती. यावेळी त्या महिलेने भाजपचे मंत्री गिरीष महाजान यांच्यावर देखील आगपाखड केली होती. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता संबधित महिलेने एक व्हिडीओ प्रसारित करत एक आपली भूमिका मांडली आहे. या महिलेचे नाव टिना चौधरी असे आहे.

महाजन यांनी आपले म्हणने ऐकले

या महिलेकडून व्हीडिओ प्रसारीत करत आपला खांदा राजकारणासाठी न वापरण्याचे सर्व पक्षांना आवाहन केले आहे. तसेच तिने आपले नाव टीना चौधरी असल्याचं तिने सांगितले आहे. तसेच ‘महाजन हे त्या रॅलीतील एकमेव व्यक्ती होते ज्यांनी माझे म्हणणे किमान ऐकण्याचा प्रयत्न केला’ असे तिने म्हटले आहे.

महाजन यांच्च्या सूचनेनुसार त्या दोन बस हलवण्यात आल्या आणि आम्ही तिथून युटर्न घेतला’ दरम्यान, आपण बाटली कोणत्याही आंदोलकांकडे किंवा रॅलीकडे फेकली नव्हती, तर पोलिसांचे लक्ष वेधण्यासाठी जमिनीवर फेकली असल्याचं महिलेचे स्पष्टीकरण, मी माझ्या मुलीला क्लासवरुन घेऊन येत असताना गाडी ट्राफिकमध्ये अडकली. मी घाबरल्यामुळे मुलीच्या काळजीपोटी मी चिडून बोललो असे तिने स्पष्ट केले आहे.

दरम्यान या प्रकरणी बोलताना त्‍यावेळी गिरीष महाजन माध्यमांशी बोलताना म्हणाले होते की 'आमचा मोर्चा जो निघाला होता तो महिलांसाठीच निघाला होता. महिलांच्या आरक्षणासंदर्भातीलच तो मोर्चा होता. मात्र त्या महिलेचा राग, संताप हा खूपच अनावर झाला होता. त्यामुळेच त्या बोलत होत्या. मात्र यापुढे आम्ही निश्चित काळजी घेऊ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT