Western Railway timetable change Pudhari
मुंबई

Mumbai Western Railway: पश्चिम रेल्वेवर आज-उद्या जम्बो ब्लॉक; कांदिवली-बोरिवलीदरम्यान वाहतूक प्रभावित

धीम्या मार्गावरील सेवा वळवणार, काही गाड्या रद्द; मध्य रेल्वेवरही रविवारी मेगाब्लॉक

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : पश्चिम रेल्वेकडून ब्रिजच्या री-गर्डरिंग कामासाठी जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. कांदिवली आणि बोरिवली स्थानकांदरम्यान अप व डाऊन धीम्या मार्गावर आज शनिवारी रात्री 10.40 वा. पासून ते रविवारी (दि.29) सायंकाळी 7.30 वा.पर्यंत, तर याचदिवशी डाऊन जलद मार्गावर पहाटे 1 ते 4.30 या वेळेत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

धीम्या लाईनवर ब्लॉकदरम्यान सर्व गाड्या गोरेगाव व बोरिवलीदरम्यान जलद मार्गावर चालविण्यात येतील. तसेच डाऊन जलद मार्गावरील ब्लॉकदरम्यान, प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्यामुळे डाऊन दिशेतील गाड्या 5 व्या मार्गावरून चालवल्या जातील. या गाड्या राममंदिर, मालाड व कांदिवली रेल्वेस्थानकांवर थांबणार नाहीत. ब्लॉक कालावधीत बोरिवली स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 वर कोणतीही गाडी चालवली जाणार नाही. काही उपनगरीय गाड्या रद्द करण्यात येतील किंवा त्या अंधेरी व गोरेगाव स्थानकांदरम्यान अंशतः (शॉर्ट-टर्मिनेट) धावतील. प्रभावित गाड्यांची सविस्तर यादी सर्व उपनगरीय स्थानकांच्या स्टेशन मास्टर कार्यालयात उपलब्ध असणार आहे. सर्व 15 डब्यांच्या स्लो सेवा अंधेरी व बोरिवलीदरम्यान दोन्ही दिशांनी फास्ट गाड्यांप्रमाणे चालवल्या जाणार आहेत.

मध्य रेल्वेचा रविवार ब्लॉक

मध्य रेल्वेने मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवारी उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉक घेतला आहे. मुख्य मार्गावर माटुंगा-मुलुंडदरम्यान सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर ब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.14 ते दुपारी 3.32 या वेळेत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील गाड्यांना माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येईल. ठाणे येथून सकाळी 11.07 ते दुपारी 3.51 या वेळेत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील गाड्या मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येईल.

ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. या कालावधीत या स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ठाणे येथून सकाळी 10.35 ते सायंकाळी 4.07 वाजेपर्यंत डाऊन मार्गावरील सेवा, तसेच पनवेल / नेरुळ / वाशी येथून सकाळी 10.25 ते सायंकाळी 4.09 वाजेपर्यंत अप मार्गावरील सेवा रद्द राहतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT